Advertisement

हीच 'ती' योग्य वेळ, परप्रांतीयांबद्दल राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना सूचना

परप्रांतीय सोडून गेल्यामुळे ज्या उद्योगधंद्यांत नोकरीच्या संधी तयार झाल्या आहेत, तिथं राज्यातील तरूणांना संधी दिली पाहिजे, अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्या.

हीच 'ती' योग्य वेळ, परप्रांतीयांबद्दल राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना सूचना
SHARES

महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळून जातील, हे मी आधीच माझ्या अनेक भाषणांतून सांगितलं आहे. कोराेनाच्या संकटकाळातही हेच चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यातून धडा घेत भविष्यकाळात महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी कायद्यान्वये बंधनकारक केली पाहिजे. शिवाय परप्रांतीय सोडून गेल्यामुळे ज्या उद्योगधंद्यांत नोकरीच्या संधी तयार झाल्या आहेत, तिथं राज्यातील तरूणांना संधी दिली पाहिजे, अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकील हजर राहून राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्याच सोबत परप्रांतीयांविषयी देखील महत्त्वाची भूमिका मांडली. याबैठकीला इतर पक्षांचे नेते देखील उपस्थित होते. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

हेही वाचा - महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे

चाचण्यांशिवाय नो एण्ट्री

महाराष्ट्रावर अडचण आली की परप्रांतीय सर्वात आधी निघून जातील, हे मी आधीच सांगितलं हाेतं. आता तेच घडत आहे. यातून बोध घेऊन परप्रांतियांच्या एण्ट्री आणि एक्झिटवर आता बंधनं आणायला हवीत. महाराष्ट्रातून जे परप्रांतीय बाहेर गेले आहेत ते परत येतील किंवा ज्यावेळी आणले जातील, त्यावेळी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्याशिवाय त्यांना परत घेऊ नये. कारण आपल्याकडे चाचण्या होत असल्या तरी ते ज्या ज्या राज्यातील आहेत, तिथं काय परिस्थिती आहे, याची आपल्याला कल्पना नाही.  

माणुसकी चालते असं नाही

तुम्ही ज्यावेळी इतर ठिकाणी जाता त्यावेळी तुमच्याकडे माणुसकीच्या दृष्टीकोनातून म्हणून पाहिलं जातंच असं नाही. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालते असं नाही. त्यामुळे परप्रांतीयांची राज्य स्थलांतरीत कायद्यांतर्गत नोदणी करून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आतापर्यंत जो गुंता झाला आहे तो यानिमित्तानं सोडवता येऊ शकतो, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

रोजगाराच्या संधी

परंप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परत जात असल्याने महाराष्ट्रीत विविध उद्योगधंद्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आपल्याकडे विदर्भ, मराठवाजा या ठिकाणी असलेल्या तरूणांपर्यंत अनेकदा रोजगारासंदर्भातील माहिती पोहोचत नाही. पण या संधीची माहिती योग्य पद्धतीने राज्यातील बेरोजगार तरूणांपर्यंत पोहोचवायला हवी. त्यांनी देखील रोजगाराची ही संधी दवडायला नको. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा