Advertisement

कोरोना रुग्णाच्या मृतदेहाद्वारे संसर्ग होत नाही, मुंबई पालिकेचा उच्च न्यायालयात दावा

वांद्रेमधील तीन कब्रस्तानांमध्ये करोनाबाधित मृतांचे दफन करणे रहिवाशांसाठी धोकादायक आहे, अशी भीती व्यक्त करत मृतदेहावर दफनविधीस विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात रहिवाशांनी केली आहे.

कोरोना रुग्णाच्या मृतदेहाद्वारे संसर्ग होत नाही, मुंबई पालिकेचा उच्च न्यायालयात दावा
SHARES

कोरोना रुग्णांच्या मृतदेहाद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही. तसंच कब्रस्तानात कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार वा दफनविधी करताना आवश्यक प्रक्रियेचे पालन करण्यात अशी भूमिका मुंबई पालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मांडली.

वांद्रेमधील तीन कब्रस्तानांमध्ये करोनाबाधित मृतांचे दफन करणे रहिवाशांसाठी धोकादायक आहे, अशी भीती व्यक्त करत मृतदेहावर दफनविधीस विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात प्रदीप गांधी व अन्य स्थानिक रहिवाशांनी केली आहे. उच्च न्यायालयाने याचिकादारांची तातडीची विनंती फेटाळल्यानंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला होता. मात्र, महापालिकेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयानेच योग्य तो निर्णय द्यावा, असे निर्देश देऊन सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवले.  उच्च न्यायालयाने पालिकेला १९ मेपर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे पालिकेची भूमिका स्पष्ट केली.

कोरोना व्यक्तींच्या मृतदेहाचे दफन केल्यास त्यातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. मृतदेहांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होत असल्याचे आजतागायत एकही उदाहरण सापडलेले नाही. त्यामुळे याचिकादारांची भीती अनाठायी आहे. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असं उत्तर मुंबई महापालिकेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे.

याचिकादारांची सोसायटी कब्रस्तानापासून ६०० फूट अंतरावर आहे. शिवाय मृतदेहांमुळे संसर्ग होत नसल्याने त्यांना धोका असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मुंबईतील वाढत्या संसर्गाचा याच्याशी संबंध लावणंही चुकीचे आहे. त्यामुळे याचिकादारांची ही याचिका दंड लावून फेटाळावी, अशी विनंतीही पालिकेनेही प्रतिज्ञापत्रात केली आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा