Advertisement

मुंबईत कोरोनाचे ११०० नवे रुग्ण, दिवसभरात ५३ जणांचा मृत्यू

शुक्रवारी दिवसभरात ६८९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८७ हजार ०७४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ११०० नवे रुग्ण, दिवसभरात ५३ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गुरूवारी पहिल्यांदा कोरोना रुग्णांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कोरोनाने राज्यात शुक्रवारी २६५ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ११०० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-मुंबईत ६१६ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे यादी

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५३ रुग्ण दगावले आहेत. तर ३० जुलै रोजी ५३ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २९ जुलै रोजी एकूण ६० जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे ११०० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १४ हजार २८७ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ६८९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८७ हजार ०७४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः –मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस

राज्यात कोरोनाचे आज ७५४३ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. आज १०,३२० नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५०  हजार ६६२  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ३० हजार ९८ नमुन्यांपैकी ४ लाख २२ हजार ११८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८१ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९९ हजार ५५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ५३५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १०,३२० नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६५ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०८५ (५३), ठाणे- २३४ (१२), ठाणे मनपा-३१९ (१३),नवी मुंबई मनपा-४१२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३७६ (१३),उल्हासनगर मनपा-५० (९), भिवंडी निजामपूर मनपा-२७ (१) , मीरा भाईंदर मनपा-१४०(४),पालघर-१४१ (४), वसई-विरार मनपा-२०० (१), रायगड-२२७ (७), पनवेल मनपा-१५०(३), नाशिक-१३१, नाशिक मनपा-३१३ (५), मालेगाव मनपा-११ (१), अहमदनगर-१६४ (१),अहमदनगर मनपा-१५९, धुळे-९८ (१), धुळे मनपा-१०८, जळगाव-२५४ (३), जळगाव मनपा-१३४, नंदूरबार-४१, पुणे- ४५२ (१६), पुणे मनपा-१६३५ (३०), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (२५), सोलापूर-१६१ (६), सोलापूर मनपा-९५ (२), सातारा-१६८, कोल्हापूर-३४२ (६), कोल्हापूर मनपा-१४७ (४), सांगली-७३ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१८० (३), सिंधुदूर्ग-१०, रत्नागिरी-९ (१), औरंगाबाद-९८ (२), औरंगाबाद मनपा-६६ (२), जालना-२७ (१), हिंगोली-३, परभणी-४१ , परभणी मनपा-१४ (२), लातूर-६६ (१), लातूर मनपा-६२ (२), उस्मानाबाद-११३ (२), बीड-४० (१), नांदेड-७४ (५), नांदेड मनपा-९ (२), अकोला-३५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-८, अमरावती मनपा-४२ (१), यवतमाळ-८८, बुलढाणा-१०२ (६), वाशिम-२५, नागपूर-२१२ (१) , नागपूर मनपा-१२९ (२), वर्धा-१३, भंडारा-४, गोंदिया-१७, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-५, इतर राज्य २१.

संबंधित विषय
Advertisement