Advertisement

मुंबईत कोरोनाचे ११२५ नवे रुग्ण, दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू

बुधवारी दिवसभरात ७११ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९१ हजार ६७३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ११२५ नवे रुग्ण, दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मंगळवारी कोरोने ३०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत बुधवारी दिवसभरात ११२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत बुधवारी दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-दिलासादायक! बोरिवलीत कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग मंदावला

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२ रुग्ण दगावले आहेत. तर ४ आँगस्ट रोजी ५६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३ आँगस्ट रोजी एकूण ४९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय बुधवारी मुंबईत कोरोनाचे ११२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १९ हजार २२५ इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात ७११ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९१ हजार  ६७३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत

राज्यात आज दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४५  हजार ९६१  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३४  करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १०,३०९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३३४ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२५ (४२), ठाणे- २३२ (४), ठाणे मनपा-२८१ (९),नवी मुंबई मनपा-२९० (४), कल्याण डोंबिवली मनपा-३७१ (२३),उल्हासनगर मनपा-३० (७), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (१८) , मीरा भाईंदर मनपा-१२५ (४),पालघर-११२ (२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-२८३ (१९), पनवेल मनपा-१७४ (१७), नाशिक-११९(१),नाशिक मनपा-५३५ (९), मालेगाव मनपा-५१, अहमदनगर-४२४ (३), अहमदनगर मनपा-२५०, धुळे-४, धुळे मनपा-४(२), जळगाव-३२३ (३), जळगाव मनपा-१४३ (१), नंदूरबार-१० (४), पुणे- ३६४ (१५), पुणे मनपा-१२८२ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-७१४ (१४), सोलापूर-२५३ (९), सोलापूर मनपा-३८, सातारा-१९३ (३), कोल्हापूर-२६४ (१२), कोल्हापूर मनपा-१६६, सांगली-८५ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-११४ (६), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-१० (२), औरंगाबाद-१७३ (१), औरंगाबाद मनपा-१०२ (४), जालना-११(१), हिंगोली-४, परभणी-१४, परभणी मनपा-३०,लातूर-१३४(१), लातूर मनपा-१८ (२), उस्मानाबाद-१४२ (३), बीड-८९ (२) , नांदेड-१२२ (३), नांदेड मनपा-१८ (२), अकोला-२८, अकोला मनपा-४, अमरावती- २२ (१), अमरावती मनपा-२७, यवतमाळ-४६, बुलढाणा-३९, वाशिम-५७, नागपूर-१२९ (२), नागपूर मनपा-३३१ (५), वर्धा-१० (३), भंडारा- ५,गोंदिया-४६, चंद्रपूर-३८, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-३९, इतर राज्य १६ (१).

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा