Advertisement

मुंबईत धोका वाढला ! २ हजार ८५ नवे रुग्ण, ४१ जणांचा दिवसभरात मृत्यू

रविवारी दिवसभरात ९०२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ३० हजार ९१८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत धोका वाढला ! २ हजार ८५ नवे रुग्ण,  ४१ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात रविवारी कोरोने ४१६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात २०८५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१ रुग्ण दगावले आहेत. तर १२ सप्टेंबर रोजी ४२ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ११ सप्टेंबर रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २०८५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ६९ हजार ६९३ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ९०२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ३० हजार ९१८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाःमहाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जातोय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आतापर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ०६१ रुग्ण बरे झाले असून आज दिवसभरात ११ हजार ५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज २२ हजार ५४३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ९० हजार ३४४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ लाख ५३ हजार ६७६ नमुन्यांपैकी १० लाख   ६० हजार ३०८ नमुने पॉझिटिव्ह ( २०.१८ टक्के) आले आहेत. राज्यात  १६ लाख ८३  हजार ७७०  लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार २९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज  ३९१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७९ टक्के एवढा आहे.


आज निदान झालेले २२,५४३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४१६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२०८५ (४१), ठाणे- ३०८ (१), ठाणे मनपा-३७८ (११), नवी  मुंबई मनपा-४०३ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५३३ (४), उल्हासनगर मनपा-७३ (२), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-१९१ (३), पालघर-२२० (३), वसई-विरार मनपा-२१३ (६), रायगड-६८२ (६), पनवेल मनपा-२३५, नाशिक-१९५ (८), नाशिक मनपा-७१३ (७), मालेगाव मनपा-४०, अहमदनगर-६२० (५),अहमदनगर मनपा-१९२ (७), धुळे-१०८ (१), धुळे मनपा-६४ (१), जळगाव-९८१ (१०), जळगाव मनपा-१३१ (३), नंदूरबार-१२४ (१), पुणे- ११२६ (१५), पुणे मनपा-२२९४ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-१००४ (२), सोलापूर-६३० (१४), सोलापूर मनपा-६३ (१), सातारा-९१२ (१९), कोल्हापूर-४३८ (१६), कोल्हापूर मनपा-२४० (२), सांगली-६४६ (१६), सांगली  मिरज कुपवाड मनपा-५६२ (९), सिंधुदूर्ग-५३, रत्नागिरी-२९२, औरंगाबाद-२५६ (२),औरंगाबाद मनपा-४२९ (२), जालना-१११ (३), हिंगोली-७१ (३), परभणी-१२१, परभणी मनपा-३८, लातूर-२१५ (४), लातूर मनपा-१०८, उस्मानाबाद-२४९ (८), बीड-२१३ (५), नांदेड-८६ (२), नांदेड मनपा-१०७ (२), अकोला-३४ (१), अकोला मनपा-९२(५), अमरावती-१८३ (६), अमरावती मनपा-१९४ (५), यवतमाळ-२२९, बुलढाणा-२४२ (५), वाशिम-१०१ (१), नागपूर-४४८ (४), नागपूर मनपा-१५३४ (६९), वर्धा-८१ (१), भंडारा-१९१ (१३), गोंदिया-९०, चंद्रपूर-१२१ (५), चंद्रपूर मनपा-१२० (४), गडचिरोली-५१, इतर राज्य- ४३.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा