Advertisement

मुंबईत कोरोनाचे २२११ नवे रुग्ण, ५० जणांचा दिवसभरात मृत्यू

शनिवारी दिवसभरात ५१०५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ४२ हजार ७६९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे २२११ नवे रुग्ण, ५० जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी कोरोने ४२५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शनिवारी दिवसभरात २२११ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५० रुग्ण दगावले आहेत. तर १७ सप्टेंबर रोजी ४३ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १८ सप्टेंबर रोजी एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २२११ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ८२ हजार ०७७ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ५१०५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ४२ हजार ७६९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रॉयल चॅलेंजर्सची नवी जर्सी

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २३ हजार ५०१ एवढ्या विक्रमी संख्येने  रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५३ टक्के) आले आहेत. राज्यात  १८ लाख  ०१ हजार १८० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ८३१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७१ टक्के एवढा आहे.

 

आज निदान झालेले २१,९०७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४२५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२११ (५०), ठाणे- ३३७ (१७), ठाणे मनपा-४०२ (१), नवी  मुंबई मनपा-४०६ (८), कल्याण डोंबिवली मनपा-४७१ (१), उल्हासनगर मनपा-५२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३७ (१), मीरा भाईंदर मनपा-१९२ (८), पालघर-१९९ (३), वसई-विरार मनपा-२५५ (७), रायगड-४५६ (१५), पनवेल मनपा-२१० (१), नाशिक-३८६ (१), नाशिक मनपा-११४१ (६), मालेगाव मनपा-१७ (१), अहमदनगर-७४४ (८),अहमदनगर मनपा-१८६ (३), धुळे-४४, धुळे मनपा-६०(१), जळगाव-५९७ (७), जळगाव मनपा-११९ (२), नंदूरबार-११३ (२), पुणे- १३६६ (१२), पुणे मनपा-१७४५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (४), सोलापूर-५३८ (१६), सोलापूर मनपा-६७, सातारा-७६७ (२६), कोल्हापूर-५२७ (२०), कोल्हापूर मनपा-१७९ (५), सांगली-६६२ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२९० (९), सिंधुदूर्ग-६० (३), रत्नागिरी-३३५ (४), औरंगाबाद-१८२ (७),औरंगाबाद मनपा-३५१ (७), जालना-१२७, हिंगोली-५९, परभणी-६२ (३), परभणी मनपा-३८ (३), लातूर-२१७ (४), लातूर मनपा-८५ (१), उस्मानाबाद-२५८ (५), बीड-१६९ (४), नांदेड-१९१ (३), नांदेड मनपा-२१७ (१), अकोला-१०९ (५), अकोला मनपा-१३० (८), अमरावती-११८ (१), अमरावती मनपा-१८८, यवतमाळ-३४८ (१३), बुलढाणा-१२७ (१), वाशिम-४२ (२), नागपूर-४७७ (१४), नागपूर मनपा-१५६९ (२२), वर्धा-९७ (३), भंडारा-२०२ (११), गोंदिया-२३३ (१), चंद्रपूर-९० (१), चंद्रपूर मनपा-७० (३), गडचिरोली-३० (२), इतर राज्य- ३१ (१).

संबंधित विषय