Advertisement

राज्यात २,९४९ नवे रुग्ण, ९३ टक्के रुग्ण करोना मुक्त


राज्यात २,९४९ नवे रुग्ण, ९३ टक्के रुग्ण करोना मुक्त
SHARES

राज्यात आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात काल दिवसभरात २९४९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर मुंबईतील रुग्ण संख्या मोठया प्रमाणात कमी होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. सोमवारी ४७७ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत सध्या केवळ ९०६८ रुग्ण उपचाराधीन आहेत. ९३ टक्के रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

हेही वाचाः- गाड्यांवरील मराठी नंबर प्लेट, मनसेने ठाकरे सरकारकडे केली 'ही' मागणी

राज्यात सोमवारी२,९४९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ४,६१० रुग्ण बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण १७,६१,६१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के आहे. राज्यात सध्या एकूण ७२,३८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी ६० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्युदर २.५६ टक्के आहे. तर मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असून रुग्ण वाढीचा दर ०.२१ टक्कय़ापर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी ३२७ दिवसांवर गेला आहे. दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे विरहित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळू लागले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत चढउतार होत असला तरी एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी अंदाजे ७५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत.सोमवारी एका दिवसात ५३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ६६ हजाराहून अधिक म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णांची दुबार नावे आणि मुंबई बाहेरील रुग्णांची नावे वगळल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन हजाराने कमी झाली आहे. सध्या ९०६८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

हेही वाचाः- कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई

मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्के अहवाल बाधित येत आहेत. आतापर्यंत २१ लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही कमी होऊ लागली आहे. सोमवारी सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सहा पुरुष होते तर एक महिलेचा समावेश आह. हे सर्व जण ६० वर्षांवरील होते. मृतांची एकूण संख्या १०,९ ८८ झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा