Advertisement

मुंबईत कोरोनाचे ७५३ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू

सोमवारी दिवसभरात ८३३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ४३०१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ७५३ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात सोमवारी कोरोने २२८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत सोमवारी दिवसभरात ७५३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सोमवारी दिवसभरात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४० रुग्ण दगावले आहेत. तर १४ आँगस्ट रोजी ४७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १५ आँगस्ट रोजी एकूण ४७ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय सोमवारी मुंबईत कोरोनाचे ७५३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २९ हजार ४७९ इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात ८३३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ४३०१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- मुंबईत मुसळधार पावसामुळं पाणी साचण्याची शक्यता

राज्यात आज कोरोनाच्या नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नविन रुग्णांचे निदान  झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ५५  हजार २६८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. कालच्यापेक्षा आज राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी  झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ०६ हजार २४८ नमुन्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ८४९३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २२८ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७५३ (४०), ठाणे- १३७ (३), ठाणे मनपा-२१२, नवी मुंबई मनपा-२५० (८), कल्याण डोंबिवली मनपा-२४९ (२), उल्हासनगर मनपा-१६ (६), भिवंडी निजामपूर मनपा-४ (२), मीरा भाईंदर मनपा-८४ (१), पालघर-१०५, वसई-विरार मनपा-६९ (२), रायगड-११५ (१०), पनवेल मनपा-११०, नाशिक-२१९ (२), नाशिक मनपा-५३५ (५), मालेगाव मनपा-५६ (१), अहमदनगर-२३५ (२),अहमदनगर मनपा-८५ (१), धुळे-४३ (२), धुळे मनपा-३८ (१), जळगाव-२९६ (९), जळगाव मनपा-६६ (२), नंदूरबार-२, पुणे- ३४१ (९), पुणे मनपा-९१९ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-६१५ (१९), सोलापूर-१९९ (६), सोलापूर मनपा-५४ (१), सातारा-२०५ (११), कोल्हापूर-२१३ (५), कोल्हापूर मनपा-१२६ (२), सांगली-१२६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१९० (४), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-५५, औरंगाबाद-११९ (१),औरंगाबाद मनपा-११६ (३), जालना-२०६ (१), हिंगोली-०, परभणी-२२, परभणी मनपा-३१ (१), लातूर-७४ (१२), लातूर मनपा-५८ (४), उस्मानाबाद-१५२ (६), बीड-८० (२), नांदेड-६६ (२), नांदेड मनपा-४३ (२), अकोला-४, अकोला मनपा-१३, अमरावती-१४, अमरावती मनपा-७५, यवतमाळ-३० (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-६१, नागपूर-८० (१), नागपूर मनपा-३५१ (४), वर्धा-५, भंडारा-१९, गोंदिया-१५, चंद्रपूर-९, चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-१३, इतर राज्य २.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा