Advertisement

Coronavirus : पुढील सुचना येईपर्यंत हाजी अली दर्गा तात्पुरता बंद

हाजी अली दर्गा सुरुवातीला काही तास चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता पुढीच सुचना मिळेपर्यंत दर्गा बंद ठेवण्यात येणार आहे.

Coronavirus : पुढील सुचना येईपर्यंत हाजी अली दर्गा तात्पुरता बंद
SHARES

सिद्धिविनायक आणि प्रभादेवी मंदिरानंतर पुढील सूचना येईपर्यंत हाजी अली दर्गा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. माहीम दर्गाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि हाजी अली दर्गाचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांनी यासंदर्भात एक निवेदन केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहराची काळजी घेण्यासाठी आणि त्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी मानवजातीच्या दिशेनं उचलेलं महत्त्वाचं पाऊल आहे."

महत्त्वपूर्ण म्हणजे शुक्रवारीचा नमाझ घरीच पढण्याबाबत मुस्लिम बांधवांना सूचना मौलाना निझामुद्दीन फखरुद्दीन आणि मौलाना अहमद कादरी यांनी दिल्या आहेत.


... म्हणून घेतला बंदचा निर्णय

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिर आणि दगडूशेठ हलवाई यांच्यासोबतच राज्यातील अनेक मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. हाजी अली आणि माहीम दर्गा इथं हजारो भाविक येत असतात. दररोज दर्शन घेण्यासाठी सरासरी ५ हजार आणि १० हजारच्या घरात भाविकांची संख्या आहे. या आठवड्याच्या सुरूवातीस दर्गा अधिकाऱ्यांनी भाविकांना दर्गाला भेट देण्याचं टाळा, असं आवाहन केलं होतं. पुढे त्यांनी दर्गा परिसरात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या होत्या. पण कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांनी दर्गा बंद ठेवणार असं जाहीर केलं.


दर्ग्यात खबरदारीचे उपाय

त्याविषयी समितीचे सदस्य मोहम्मद इब्राहिम खान म्हणाले होते की, "लोकांना काय करावं आणि काय करु नये याविषयी जनजागृती करण्यासाठी व्यवस्थापन सर्व प्रयत्न करीत आहे. खादीम (पुष्प अर्पण करणारी व्यक्ती), कर्मचारी आणि स्वयंसेवक वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुखवटे आणि हातमोजे घालूनच भाविक दर्शनासाठी येतील, अशी व्यवस्था केली आहे. दर्ग्यात प्रवेश करण्यापूर्वी साबणानं हात धुता यावेत याची व्यवस्था देखील केली आहे. याव्यतिरिक्त, लोकांना त्यांच्या शरीराचं तापमान तपासल्यानंतरच आत सोडण्यात येत आहे.”


दर्गा तात्पुरता बंद

याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर वैद्यकीय कक्षात मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत. ट्रस्टच्या मालकीचे संगणक केंद्र, प्राथमिक शाळा, फिटनेस सेंटर आणि लायब्ररी बंद करण्यात आली आहे. दर्गा आवारात भाविकांची गर्दी होऊ नये आणि त्याठिकाणी भरपूर वेळ घालवू नये यासाठी कर्मचारी, व्यवस्थापक, समिती सदस्य आणि स्वयंसेवक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. दर्गाच्या प्रत्येक कोपऱ्यावर अनेक बॅनर आणि होर्डिंग्ज आहेत. जी या प्राणघातक विषाणूविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करतात.हेही वाचा

Coronavirus : 'त्या' कोरोनाबाधितानं लावली चक्क लग्नाला हजेरी, सगळेच संशयाच्या फेऱ्यात

Coronavirus Update: महाराष्ट्रात ‘या’ पळवाटेने येताहेत कोरोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिली विमानतळाला भेट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा