Advertisement

प्रार्थनास्थळे उघडल्यानेच कोरोना रुग्ण वाढले, महापौरांचा दावा

दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यात आल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

प्रार्थनास्थळे उघडल्यानेच कोरोना रुग्ण वाढले, महापौरांचा दावा
SHARES

दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यात आल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल. कोरोना खूप वाईट असून तो अजून पूर्णपणे संपलेला नाही, असंही महापौर म्हणाल्या. (coronavirus patients increases after religious places reopen during diwali says bmc mayor kishori pednekar)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednaker) म्हणाल्या की, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईची लाइफलाईन लोकल ट्रेन सेवा अजूनही सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली नाही तसंच मुंबई परिसरातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने हे अत्यंत संवेदनशील विषय आहेत. त्यामुळे कुणाच्याही दबावाला न जुमनता सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. शाळा सुरु झाल्यावर ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मीडियावर पालक देखील तूर्तास शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही त्यामागची भावना आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- बीएमसी व्यापारी, फेरीवाल्यांची कोरोना चाचणी करणार

लोकल ट्रेनचा वापर बहुतांश मुंबईकर करतात. पीक अवरमध्ये लोकलमध्ये होणारी गर्दी सर्वांनाच ठाऊक आहे. कोरोना संसर्गाच्या काळात लोकल ट्रेनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग कुठल्याही कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो. तसं झाल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे सध्या तरी लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होऊ नये. या मुद्द्यावरून केवळ एक ते दोन टक्के लोकं सरकारला लक्ष्य करीत असली, दबाव टाकत असली, तरी त्यांना त्यांचं मत मांडू द्या. आम्हाला या दबावापेक्षा (coronavirus) लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत, असंही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा