Advertisement

ग्रँट रोड पुलाला तडे, नाना चौकातून वळवली वाहतूक


ग्रँट रोड पुलाला तडे, नाना चौकातून वळवली वाहतूक
SHARES

ग्रॅंट रोड रेल्वे स्थाकाजवळील उड्डाणपुलाला (फेरस पूल) तडे गेल्याने बुधवारी सकाळपासून या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे नाना चौकातून या पुलावरून होणारी वाहतूक केनेडी पूल व अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.


महापालिकेकडे जबाबदारी

अंधेरी येथील उड्डाणपुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळून दुर्घटना झाल्यानंतर बुधवारी सकाळी या ग्रँट रोड पुलाला तडे गेल्याचं दिसून आलं. सकाळी ही बाब लक्षात आल्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेला या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदत्तीने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. 



मुंबई महापालिकेचे वाॅर्ड अधिकारी, अग्निशमन दल अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून पुलाचं निरीक्षण झाल्यावरच त्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. केनेडी पूल जुना असून या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे आहे.



पृष्ठभागावर भेगा

मुंबई महापालिकेच्या डी विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा पूल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आल्याचं सांगितलं. या पुलाच्या पृष्ठभागावर अर्थात सरफेसवर भेगा पडल्या आहेत, पण पुलाच्या खालील बाजूस अशा भेगा नाहीत. त्यामुळे या पुलाला धोका नाही. तरीही रेल्वे आणि महापालिकेच्या पूल विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त पाहणी नंतर पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे पृष्ठभागावरील भेगा असल्यास त्यावर डांबरीकरण करून तो भाग व्यवस्थित केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

अंधेरीचा गोखले पूल बंद, 'या' मार्गावरून करा प्रवास

पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, पण २०-२५ मिनिटाने उशीरा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा