Advertisement

पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, पण २०-२५ मिनिटाने उशीरा


पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, पण २०-२५ मिनिटाने उशीरा
SHARES

अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक ट्रॅकवर आली असली, तरी बुधवारी सकाळपासून जलद आणि धिम्या मार्गावरील वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशीरानेच सुरू आहे. तर काही लोकल रद्द करण्यात येत असल्याने प्रवासी वैतागले आहेत.  


१६ तासानंतर पूर्वपदावर

अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा गोखले पुलाचा काही भाग सकाळी ७ वाजेच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळल्याने मंगळवारी तब्बल १६ तास पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले असून २ जणांची प्रकृती अत्यावस्थ आहे. दुपारच्या सुमारास आधी गोरेगाव ते विरार आणि वांद्रे ते सीएसटीएम मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याने मध्येच अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला होता.

तर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी ट्रॅकवरील ढिगारा उपसल्यावर संध्याकाळी १२ तासांनंतर सर्वप्रथम अंधेरी ते सीएसटीएम ही हार्बर सेवा आणि त्यानंतर अंधेरी ते चर्चगेट लोकल धावल्यावर प्रवाशांच्या जीवात जीव आला.



वाहतूक धिम्या गतीने

त्यानंतर बुधवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील जलद आणि धिम्या ट्रॅकवरील वाहतूक सुरळीत झाली. परंतु सकाळपासूनच दोन्ही मार्गावरील वाहतूक अंदाजे २० ते २५ मिनिटे उशीराने धावत असल्याचं चित्र प्रत्येक स्थानकावर दिसून येत आहे.


प्रवाशांच्या मनात भीती

पश्चिम रेल्वेच्या बहुतेक सर्वच स्थानकांवर कार्यालयीन वेळेनुसार प्रवाशांची गर्दी झाली असून प्रवासी आपल्या वेळेनुसार लोकल पकडताना दिसत आहेत. तरी लोकमध्ये चढलोय खरं, पण आपल्या वाटेला असा कुठला प्रकार येऊ नये, अशी भीती सातत्याने मनात दाटून येत असल्याची भावना कांदिवलीचे प्रवासी विश्वास राऊळ यांनी व्यक्त केली.

मी बोरीवलीहून लोकलमध्ये चढलोय पण राहून राहून कालची दुर्दैवी घटना आठवत आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नसली, तरी लोकलमधून प्रवास करताना कधी काय घडेल, याचा जराही भरवसा वाटत असल्याची प्रतिक्रिया आशिष चव्हाण यांनी दिली.

लोकलमधील बहुतेक प्रवासी अंधेरी आल्यावर कुतूहलाने दुर्घटनाग्रस्त पुलाकडे पाहून कुजबुजताना दिसत होते.



हेही वाचा-

अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाखांचं बक्षीस

उपनगरातील ४४५ पुलांचं आयआयटी करणार आॅडिट - रेल्वेमंत्री



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा