Advertisement

सीएसएमटीच्या मोकळ्या जागेत होणार 'रेल मॉल'

या प्रकल्पाच्या उभारणीकरीता नुकतेच पात्रतेसाठी विनंती अर्ज मागवण्यात आले आहेत.

सीएसएमटीच्या मोकळ्या जागेत होणार 'रेल मॉल'
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील (सीएसएमटीच्या) मोकळ्या जागेत 'रेल मॉल' तयार करण्यात येणार आहे. याबाबत इंडियर रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉपोर्रेशननं (आयआरएसडीसी) मास्टर प्लॅन तयार केला असून, यामध्ये मॉल, मनोरंजन स्थळांचा समावेश आहे. युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश असलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुर्नविकासासाठी आयआरएसडीसीकडून करण्यात येत आहे.

सीएसएमटी ते भायखळा दरम्यान १.४० लाख चौरस मीटर जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीकरीता नुकतेच पात्रतेसाठी विनंती अर्ज मागवण्यात आले आहेत. या प्रकल्पाचा खर्च १६४२ कोटी रुपये अपेक्षित आहे. सीएसएमटी पुर्नविकास प्रकल्पांतर्गत सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान २.५० लाख चौरस मीटर जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

या जागेपैकी १.४० लाख चौरस मीटर जागी ही सीएसएमटीमध्ये आणि ८०,००० चौरस मीटर जागा भायखळा परिसरात उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पी. डिमेलो मार्गावरील सीएसएमटी स्थानकातील प्रवेशद्वाराजवळील मोकळ्या जागेत मॉलसारख्या सुविधा देण्यात येणार आहे. या ठिकणी प्रवाशांना किरकोळ खरेदी-विक्री करता यावी, यासाठी दुकानं, पीव्हीआर अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत.

या असणार सुविधा

  • पुर्नविकासाची इमारत सिटी सेंटर रेल्वे मॉलप्रमाणे असणार आहे. 
  • मॉलमध्ये फूडकोर्ट आणि चित्रपटगृहे, प्लेझोन देखील उभारण्यात येणार आहे. 
  • सर्वसामान्यांचा दैनंदिन गरजा पूर्ण करण्याकरीता खरेदी-विक्रीसाठी मुभा येथे प्रवाशांना असणार आहे. 
  • प्रवाशांना खरेदी-विक्रीसाठी अनावश्यक प्रवास टाळता येईल. 
  • पुर्नविकासानंतर मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब अशी ओळख सीएसएमटीची होईल. 



हेही वाचा -

रिक्षातून करायचे सोनसाखळी चोरी, ओशिवरा पोलिसांनी केली तिघांना अटक

राज्यात ११ हजार ०१५ नवे रुग्ण, दिवसभरात २१२ जणांचा मृत्यू


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा