Advertisement

cyclone Tauktae : मुंबईसह 'या' शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसंच ताशी १२० कि.मी. वेगानं वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तविली आहे.

cyclone Tauktae : मुंबईसह 'या' शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
SHARES

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सोमवारी मुंबईनंतर आता तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढे सरकलं. पण हे वादळ जरी गुजरातच्या दिशेनं गेलं असलं तरी या वादळाचा धोका कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाची तीव्रता ही कमी झाली आहे. पण मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसंच ताशी १२० कि.मी. वेगानं वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तविली आहे. त्यामुळं यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. सोमवारी तौत्के चक्रीवादळानं रौद्र रूप धारण करत मुंबईला झोडपून काढलं. संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले.

सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेनं १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेनं १९४ मि.मी. पावसाची नोंद केली. महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.

मुंबईत महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, सक्कर पंचायत चौक वडाळा, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय सायन, बिंदुमाधव ठाकरे जंक्शन वरळी, पठ्ठे बापुराव मार्ग ग्रँटरोड, चंदन स्ट्रीज मशीद बंदर रोड, चिराबाजार, शंकर बारी लेन, ५६ मोदी स्ट्रीट कुलाबा, जेजे रोड जंक्शन, बीडीडी चाळ अमृतवार मार्ग वरळी, अंधेरी सबवे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सबवे, लोखंडवाला लेन अंधेरी, मालवणी गेट नं. ६, योगीनगर बोरीवली, यशवंत नगर वाकोला या ठिकाणी पाणी भरले होते.



हेही वाचा -

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, तर ८ जण जखमी

Cyclone Tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा