मालाड - मालाड पश्चिमेकडील लिंक रोड माईंडस्पेस गार्डन बाहेरील तुटलेल्या रेलिंगकडे सर्वच यंत्रांकडून दुर्लक्ष करण्यात आलं आहे. दोन ते तीन महिन्यांपासून हे रेलिंग तुटून पडलंय. हे रेलिंग म्हणजे उद्यानाबाहेरील तटरक्षक भिंतींच होत्या. स्थानिक आमदार असलम शेख यांच्या विकासनिधीतून हे काम करण्यात आलं होतं. पाहाणी केल्यानंतर या रेलिंगचं काम करून घेण्यात येईल, असं स्थानिक नगरसेवक परमिंदर भामरा यांनी सांगितलं.