बेस्ट कामगार संपावर जाणार का? 17 जुलैला होणार निर्णय

 Mumbai
बेस्ट कामगार संपावर जाणार का? 17 जुलैला होणार निर्णय
Mumbai  -  

बेस्ट प्रशासन दिवसेंदिवस तोट्यात जात असल्याने कामगारांना पगार देणे देखील प्रशासनाला शक्य होत नाही. परिणामी मुंबई महापालिकेने बेस्टची संपूर्ण जबाबदारी स्वीकारुन बेस्टला आर्थिक मदत केली पाहिजे, अशी भूमिका बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीने घेतली आहे. कामगारांच्या हितासाठी बेस्टमध्ये संप करायचा की नाही याचा निर्णय बेस्टच्या कामगारांनी घ्यावा, यासाठी बेस्टच्या विविध डेपोमध्ये मंगळवारपासून मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या 18 जुलै रोजी संपाचे भवितव्य ठरणार आहे.

कामगारांनी संपाच्या भूमिकेवर मतदान करण्यासाठी 17 जुलै पर्यंत विविध डेपोमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर 17 जुलै रोजी वडाळा येथील सभेमध्ये संपाचा निर्णय होणार आहे.


18 जुलै रोजी संपाचे भवितव्य ठरणार

यामध्ये बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, बेस्ट कामगार संघटना, समर्थ बेस्ट कामगार संघटना, भाजपा बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉईज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ आणि बेस्ट जागृत कामगार संघटनेचा समावेश असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बेस्टमधील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीची स्थापना केली आहे. 30 जून रोजी झालेल्या बैठकीत कृति समितीने बेस्ट कामगारांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमूवर हे मतदान घेण्यात येणार आहे.


काय आहेत मागण्या?

  • बेस्ट कामगारांचे थकित मासिक वेतन द्या
  • इतर प्रदाने देण्याची कायदेशीर जबाबदारी स्वीकारा
  • प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वापरण्यात येणारी ट्रायमॅक्सची बिघडलेली यंत्रे बदला
  • बसगाड्या आणि कर्मचारी कंत्राटी घेऊ नका
हे देखील वाचा - 

बेस्ट तोट्यातच : महापौरांची बैठकीची चौथी फेरी निष्फळ

बेस्टप्रमाणे महापालिकेलाही शिवसेना खड्ड्यात घालणार!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments