Advertisement

देवनार डम्पिंग ग्राऊंडची होणार भौगोलिक चाचणी


देवनार डम्पिंग ग्राऊंडची होणार भौगोलिक चाचणी
SHARES

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागार टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांच्या सल्ल्यानुसार आता येथील भौगोलिक चाचणी करण्यात येणार आहे. या भौगोलिक चाचणीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.


'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प हाती

देवनार डम्पिंग ग्राऊंड येथील सुमारे १२ हेक्टर जागेवर कचऱ्यापासून शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आली असून ही प्रक्रिया जुन २०१८पर्यंत पूर्ण होणार आहे.


कंत्राटदाराची नेमणूक

प्रकल्पासाठी नेमलेल्या टाटा कंन्सल्टिंग इंजिनिअर्स या सल्लागाराने केलेल्या शिफारशीनुसार प्रकल्पासाठी मशिनरीची उभारणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा भौगोलिक चाचणी अहवाल व भौगोलिक तांत्रिक तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. या कामासाठी रेणुका कन्सल्टंट्स या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी ७७ लाख रुपये खर्च येणार आहे.


हेही वाचा -

देवनार डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग! लावली की लागली?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा