Advertisement

ड्रोन वापरून दुर्गम गावात COVID-१९ लस वितरीत

ड्रोननं २५ किमी रस्ता अवघ्या १० मिनिटांत पार करत सर्व लस गावात पोहोचवल्या आहेत.

ड्रोन वापरून दुर्गम गावात COVID-१९ लस वितरीत
(Representational Image)
SHARES

पालघर जिल्ह्यातील झाप गावात सुमारे ३०४ जव्हार आदिवासींनी कोविड-19 लसीकरणाचा पहिला डोस प्राप्त केला. याचे श्रेय पालघर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अनोख्या ड्रोन सेवेला मिळते. शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी हा प्रयोग करण्यात आला.

कोरोनाव्हायरस लसीचे ३०० डोस हे या ड्रोनच्या मदतीनं वाहतूक करण्यात आले. अवघ्या १० मिनिटांत, राजीव गांधी स्टेडियम, जव्हार ते झाप गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) पर्यंत ड्रोननं २५ किमी रस्ता पार केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, "ड्रोनद्वारे पालघरच्या दुर्गम भागात यशस्वीपणे लस उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पालघर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन करतो."

अहवालानुसार, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्यानं ब्लू इन्फिनिटी इनोव्हेशन लॅब आणि IIFL फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे ड्रोन उपक्रम शक्य झाला. काही खात्यांचा दावा आहे की, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ प्रदीप व्यास यांनी ड्रोन ५ किलोग्रॅमच्या वैद्यकीय वस्तू वाहून नेऊ शकतो हे समोर आणले.

प्रायोगिक चाचणीचे सूत्रसंचालन करणारे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. महाराष्ट्रातील २० किमीचा हा बहुधा पहिलाच प्रयोग असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.हेही वाचा

वर्षाअखेरीस 'हे' जिल्हे १००% प्रथम डोसचे लक्ष्य पूर्ण करतील

ख्रिसमस आणि नव वर्षासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जारी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा