Advertisement

मुंबईत १३ ठिकाणी भिंत कोसळली


मुंबईत १३ ठिकाणी भिंत कोसळली
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचं धूमशान सुरूच असून रविवारीही मुंबई शहर अाणि उपनगरात पावसानं तुफान बॅटिंग केली. पावसामुळे अातापर्यंत मुंबईतील ३० जणांना अापले प्राण गमवावे लागले असून अंधेरीतील पूल दुर्घटना तसेच वडाळ्यात इमारतीच्या पार्किंगचा एक भाग कोसळल्याच्या घटना घडल्या अाहेत. रविवारीही मुंबईत १३ ठिकाणी घराचा किंवा भिंतीचा भाग पडल्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेकडे प्राप्त झाल्या अाहेत. महापालिका अतिरिक्त अायुक्त विजय सिंघल यांनी ही माहिती दिली अाहे. 


एकही जखमी नाही

मुंबई शहरात ४ ठिकाणी, पूर्व उपनगरात ५ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात ४ ठिकाणी अशा एकूण १३ ठिकाणी घर किंवा भिंतीचा भाग कोसळला अाहे. मात्र या सर्व घटनांमध्ये कुणीही जखमी झाल्याची नोंद नाही. कुर्ला पश्चिम येथील हवालपूल येथील भूषणभवन इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. अग्निशमन नियंत्रण कक्ष अाणि पोलिसांकडून मदतकार्य सुरू अाहे.


फोर्ट परिसरात सर्वाधिक पाऊस

रविवारी मध्यरात्री ते दुपारी ३ वाजेपर्यंत महानगरपालिका मुख्यालय (फोर्ट) परिसरात सर्वाधिक १८७ मिमि. पावसाची नोंद झाली असून कुलाबा येथे १६७ मिमि., शिवडी येथे १५८ मिमि. पावसाची नोंद झाली अाहे. पूर्व उपनगरात कुर्ला येथे १३७ मिमि तर घाटकोपर येथे १३२ मिमि. पाऊस पडला अाहे. पश्चिम उपनगरात मरोळ येथे १६१ मिमि तर वर्सोवा येथे १३१ मिमि. पावसाची नोंद झाली अाहे.


हेही वाचा -

मुंबईत पावसाचा जोर वाढणार - हवामान विभाग

राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : विद्यापीठानं घेतली 'त्या' अपंग विद्यार्थ्याची दखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा