500 रुपयांसाठी हत्येचा प्रयत्न

 Tagore Nagar
500 रुपयांसाठी हत्येचा प्रयत्न

विक्रोळी - पैशाच्या वादातून तरुणाने दारूच्या नशेत एका तरुणावर काचेच्या बाटलीने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विक्रोळीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. राजेश चव्हाण (२९) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर विक्रोळीतल्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवारनगर 2 मध्ये राहाणाऱ्या राजेश याने याच परिसरातील नरेंद्र सिंग (२४) याच्याकडून पाचशे रुपये उसने घेतले होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास दोघेही दारू प्यायला बसले होते. त्यावेळी पैशांवरून सिंग याने राजेश याच्यासोबत वाद घातला. दोघांमध्ये सुरु झालेला वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात सिंगने राजेशला मारहाण करत त्याच्यावर बियरच्या बाटलीने वार केला. त्यानंतर मदतीसाठी धाव घेत स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी लहान भाऊ राकेश याने आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सिंग या अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading Comments