Advertisement

मलबार हिल देखील सील, राजभवन भेट ३० एप्रिलपर्यंत स्थगित

कोरोना व्हायरस (coronavirus) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राजभवन भेटीची योजना ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राजभवन प्रशासनाने घेतला आहे.

मलबार हिल देखील सील, राजभवन भेट ३० एप्रिलपर्यंत स्थगित
SHARES

कोरोना व्हायरस (coronavirus) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राजभवन भेटीची योजना ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राजभवन प्रशासनाने घेतला आहे. राजभवनाच्या संकेतस्थळावर एप्रिल महिन्यासाठी राजभवन भेटीचं आरक्षण केलेल्या लोकांना कालांतराने राजभवनाला (rajbhavan) भेट देता येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

याआधी १७ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत नागरिकांसाठी राजभवन भेटीचा कार्यक्रम बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राजभवनच्या संकेतस्थळावर भेटीसंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. “राजभवन भेटीची (rajbhavan visit) योजना आता दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे”. असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. 

हेही वाचा- कोराना रुग्णांच्या परिसराची माहिती मिळणार पालिकेच्या संकेतस्थळावर

राजभवनचं वैशिष्ट्य

मुंबईतील मलबार हिल येथील अंदाजे ५० एकर जमिनीवर वसलेलं राजभवन (raj bhavan) हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान आहे. राजभवनच्या तिन्ही बाजूंना समुद्र आहे. तब्बल दीड शतकांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेली ही वास्तू आहे. राजभवन येथील सुंदर गालिचे, चित्रे, अत्युत्कृष्ट कोरीव काम केलेले दरवाजे व शोभिवंत फ्रेंच शैलीच्या खुर्च्या व सुंदर प्रतिमा असलेले सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे. येथील कलादालन तसंच ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक राजभवनला दरवर्षी भेट देतात. 

मलबार हिल सील

मुंबईतील (mumbai seal) कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राजभवनची भेट स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील १४६ ठिकाणं सील करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या मदतीनं बॅरिकेंटींग करून हे परिसर सील करण्यात आले आहेत. तसंच या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची खबरदारी ही पालिकेतर्फे घेण्यात आली आहे.

हेही वाचा- 'या' बँकांनी दिली ईएमआय भरण्यास सवलत

दक्षिण मुंबईतील ४८ जागा असून, यामध्ये मलबार हिल्स, वाळकेश्वर, पोद्दार रोड, बेलासिस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीसारख्या परिसरांचा समावेश आहे. तर, मुंबईतील पश्चिम भागातील ४६ ठिकाणं सील करण्यात आली आहेत. यामध्ये वांद्रे पश्चिम आणि खास या ठिकाणांचा प्रामुख्यानं समावेश आहे. पूर्वेकडील ४८ ठिकाणं देखील महापालिकेनं सील करण्याचा निर्णय घेतला आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा