Advertisement

मुंबई लोकलनं प्रवास करण्यासाठी 'या' प्रवाशांना पूर्ण लसीकरण अनिवार्य

यासंदर्भातील निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात आला आहे.

मुंबई लोकलनं प्रवास करण्यासाठी 'या' प्रवाशांना पूर्ण लसीकरण अनिवार्य
SHARES

अत्यावश्यक कामगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करायचा असल्यास पूर्ण लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. यासंदर्भातील निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात आला आहे.

सध्या, अत्यावश्यक सेवा विभागातील लोकांना त्यांच्या लसीकरणाची स्थिती विचारात न घेता पास देण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही.

परंतु आता सरकारचा असा विश्वास आहे की, शहरात लसीकरणाचा उपक्रम सुरू झाल्यापासून बराच काळ लोटला आहे. या व्यतिरिक्त, ज्या गतीनं लसीकरण केले जात आहे त्यानुसार बऱ्याच जणांचे लसीकरण झाले आहे. त्यात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि सरकारी अधिकारी यांचाही समावेश आहे.  

महाराष्ट्र सरकारनं ८ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशात लसीकरण केलेल्या व्यक्तीची व्याख्या पूर्ण लसीकरण केलेल्या आणि १४ दिवस पूर्ण झालेली व्यक्ती अशी केली आहे. याव्यतिरिक्त, वैद्यकीय समस्या किंवा वयोमर्यादेमुळे जे स्वतःला लसीकरण करू शकत नाहीत त्यांचा देखील समावेश आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं घोषित केलं आहे की, लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी पूर्णपणे लसीकरण करणं अनिवार्य आहे.  शिवाय, प्रवासासाठी अनिवार्य असणारा पास केवळ त्या श्रेणीतील लोकांनाच दिला जाईल.

शिवाय, वर दिलेल्या व्याख्येखाली असलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या रेल्वे प्रवासासाठी पासेस देण्याची परवानगी आहे.


हेही वाचा

लोकल ट्रेन्स बाबत मोठा निर्णय, २८ ऑक्टोबरपासून...

सर्वांना लोकलनं प्रवास करू देण्याची मागणी, हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना खडसावलं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा