Advertisement

८ महिन्यांनंतरही एमएमआरडीएचं सदस्यत्व मिळेना; ३ नगरसेवक प्रतिक्षेत


८ महिन्यांनंतरही एमएमआरडीएचं सदस्यत्व मिळेना; ३ नगरसेवक प्रतिक्षेत
SHARES

मुंबई महापालिकेच्या तीन नगरसेवकांची एमएमआरडीएच्या सदस्यपदी निवड होऊनही नगरविकास खात्याने या सर्वांची निवडच बासनात बांधून ठेवली आहे. फेब्रुवारीमध्ये महापालिका सभागृहात एमएमआरडीएच्या सदस्यपदी निवड होऊनही नगरविकास खात्याने आजतागायत यांची अधिसूचना जारी केली नाही. या तीन सदस्यांमध्ये विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा समावेश असून ते काँग्रेसचे नगरसेवक असल्यानेच त्यांच्या सदस्य निवडीचा प्रस्ताव सरकारनं गुंडाळून ठेवल्याची चर्चा आहे.


फेब्रुवारीमध्ये निवड

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून तत्कालीन सभागृहनेते यशवंत जाधव, भाजपाचे गटनेते मनोज कोटक आणि विरोधी पक्षेनते रवी राजा आदी नगरसेवकांचं नामनिर्देशन करण्यात आलं होतं. नगरविकास खात्यानं १० नोव्हेंबर २०१७ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून एमएमआरडीएवर ३ महापालिका नगरसेवकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली होती. त्यानुसार फेब्रुवारी २०१८ मध्ये या तिघांची निवड करण्यात आली.


अधिकृत घोषणा नाही

या निवडीनंतर २० फेब्रुवारी रोजी महापालिका चिटणीस यांच्या स्वाक्षरीनं महापालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलं. पुढे हे पत्र नगरविकास खात्याला पाठवण्यात आलं. परंतु फेबुवारीपासून ८ महिने उलटत आले तरी या तिघांची एमएमआरडीएचे सदस्य म्हणून अधिकृत घोषणा होऊ शकली नाही की त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.


काँग्रेसचा असल्यामुळेच अन्याय

याचा तीव्र निषेध विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नोंदवला आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष हे एमएमआरडीएचे पदसिध्द सदस्य आहेत. त्यामुळे यशवंत जाधव हे पूर्वी सभागृहनेते होते. परंतु आता ते स्थायी समिती अध्यक्ष असल्यामुळे ते सदस्य बनले. परंतु कोटक हे भाजपाचे असून आपण केवळ काँग्रेसचे असल्यामुळे मुख्यमंत्री याची जाणीवपूर्वक अधिसूचना जारी करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. जर अधिसूचना काढली तरी एमएमआरडीएच्या सभेला आपण उपस्थित राहू आणि याची माहिती काँग्रेस सदस्य म्हणून आपल्याला होईल, याच भीतीने मुख्यमंत्री ही अधिसूचना जारी करत नसल्याचा आरोप राजा यांनी केला आहे.हेही वाचा -

महापालिका शाळांचा कायापालट, पण पटसंख्या वाढेल का?

नेमकं कसं आहे कलम ३७७?
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा