Advertisement

खाद्य पदार्थांसोबत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री नाही, एफडीएचा निर्णय

केंद्र सरकारने शाळकरी मुलांना आणि तरूणांना तंबाखूच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी अन्नपदार्थांसोबत तंबाखू-तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर बंदी घालण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले होते. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नपदार्थांसोबत अशा पदार्थांची विक्री करण्यावर बंदी घातली आहे. त्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

खाद्य पदार्थांसोबत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री नाही, एफडीएचा निर्णय
SHARES

घरालगतच्या वा शाळेलगतच्या पान टपरीवर किंवा जनरल स्टोअर्समध्ये लहान, अल्पवयीन मुलं चाॅकलेट, बिस्किट, वेफर वा इतर काही खाद्य पदार्थ आणायला जातात. त्यांची नजर दुकानांमध्ये असलेल्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पडते. अशावेळी अनेक लहान मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं आकर्षण वाटतं. नकळत 'घेऊन बघू' म्हणत या पदार्थांचं सेवन होतं आणि हळूहळू लहान वयातच मुलांना व्यसन लागतं. पण आता त्यावर वचक बसणार आहे.



..अखेर एफडीएनं निर्णय घेतला

हीच बाब लक्षात घेत केंद्र सरकारने शाळकरी मुलांना आणि तरूणांना तंबाखूच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी अन्नपदार्थांसोबत तंबाखू-तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर बंदी घालण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले होते. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नपदार्थांसोबत अशा पदार्थांची विक्री करण्यावर बंदी घातली आहे. त्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती एफडीए आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


बंदी घालणारं महाराष्ट्र पहिलं राज्य!

या अधिसूचनेनुसार आता पान टपरी, जनरल स्टोअर्स वा जिथे कुठे अन्नपदार्थ विकले जातात, तिथे सिगारेट, बिडी, पान, मावा असे तंबाखू वा तंबाखूजन्य पदार्थ विकता येणार नाहीत. अशी बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचंही डाॅ. दराडे यांनी स्पष्ट केलं आहे. ही बंदी तात्काळ लागू करण्यात आली असून, आता एफडीएची विक्रेत्यांवर करडी नजर असणार आहे!



तिथल्या तिथे होणार कारवाई!

अशी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तिथल्या तिथे कारवाई करण्याचे आदेश एफडीएकडून अन्न निरीक्षकांना देण्यात आले आहेत. अशा विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान एफडीएचा हा निर्णय एेतिहासिक असल्याचं म्हणत सर्वच स्तरातून या निर्णयाचं स्वागत होत आहे.



हेही वाचा

ब्रँण्डनेम फक्त नावालाच? मॅक्डाॅनल्डमध्येही बनतात अस्वच्छ पदार्थ, एफडीएने केली कारवाई


Read this story in हिंदी or English or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा