Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी मोडला विक्रम!

पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन दिवसांच्या विरामानंतर बुधवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी मोडला विक्रम!
SHARES

पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन दिवसांच्या विरामानंतर बुधवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३१ ते ३५ पैशांनी तर डिझेलच्या दरात ३३ ते ३७ पैशांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे भारतातील पंपांच्या किमती प्रति बॅरल $८४ च्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

ऑटो इंधनाच्या किमतींमुळे पेट्रोल प्रति लिटर अंदाजे ३६.३५ रुपये आणि डिझेल सुमारे २९ रुपयांनी महागले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ झाल्यानं सरकारवर कर कमी करण्याचा दबाव येऊ शकतो, ज्यामुळे महसूल आणि खर्चावर विपरित परिणाम होऊ शकतो.

मुंबई
पेट्रोल – ११३.८० रुपये प्रति लीटर
डिझेल – १०४.७५ रुपये प्रति लीटर

पुणे
पेट्रोल – ११३.२७ रुपये प्रति लीटर
पॉवर पेट्रोल – ११६.९५ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०२.६२ रुपये प्रति लीटर
सीएनजी – ६२.१० रुपये

कोलकत्ता
पेट्रोल – १०८.४५ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९९.७८ रुपये प्रति लीटर

चेन्नई
पेट्रोल – १०४.८३ रुपये प्रति लीटर
डिझेल – १००.९२ रुपये प्रति लीटर



हेही वाचा

दादरमध्ये बेस्ट बसच्या अपघातात ७ जण जखमी, पहा व्हिडिओ

वाहनांसाठी नवी नियमावली, चिमुकल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्राचा प्रस्ताव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा