Advertisement

शीव तलावात पुढील वर्षापासून विसर्जन बंद; मासे मरत असल्याने निर्णय

मागील अनेक दशकांपासून गणेश विसर्जन तसेच देवी विसर्जन शीव येथील तलावांमध्ये केलं जातं. मात्र, या तलावात पुढील गणेशोत्सवात गणेशमूर्तींचं विसर्जन करता येणार नाही. तलाव विसर्जनासाठी बंद असेल अशी नोटीसच महापालिकेच्या एफ-उत्तर विभागाच्यावतीनं तिथं चिकटवण्यात आली आहे.

शीव तलावात पुढील वर्षापासून विसर्जन बंद; मासे मरत असल्याने निर्णय
SHARES

शीव येथील तलावांमध्ये होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाण्यातील मासे मरत असल्यामुळे हे तलाव पुढील गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका प्रशासनाने केली आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी नोटीस चिकटवून हे तलाव पुढील वर्षांपासून विसर्जनासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, शिवसेनेने याचा तीव्र विरोध केला असून भाजपाच्या नगरसेविकेने मात्र याचं समर्थन केलं आहे.


भाविक, रहिवाशांमध्ये संताप

मागील अनेक दशकांपासून गणेश विसर्जन तसेच देवी विसर्जन शीव येथील तलावांमध्ये केलं जातं. मात्र, या तलावात पुढील गणेशोत्सवात गणेशमूर्तींचं विसर्जन करता येणार नाही. तलाव विसर्जनासाठी बंद असेल अशी नोटीसच महापालिकेच्या एफ-उत्तर विभागाच्यावतीनं तिथं चिकटवण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जनासाठी येणारे भाविक व रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. असा निर्णय घेताना प्रशासनाने विभागातील नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधींना विश्वास घ्यायला हवं. त्यामुळे ही नोटीस त्वरीत काढून टाकण्यात यावी, अशी मागणी करण्यात अाली अाहे. 


मासे, कासव मरतात

यावर मत व्यक्त करताना भाजपा नगरसेविका राजश्री शिरवाडकर म्हणाल्या की, या तलावात दरवर्षी मूर्ती विसर्जनानंतर मासे अाणि कासव मरतात. या तलावात अंत्यविधीचे कार्यक्रमही केले जातात. तसंच गर्दुर्ले आणि इतरांचाच राबता येथे असल्यामुळे येथे अनेक गैरकृत्य चालतात. त्यामुळे तलाव बंद करण्यात येणार अाहे. याला पर्याय म्हणून कृत्रिम तलावांची उभारणी केली जावी, अशीही मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे  विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही याचा तीव्र विरोध करून अशाप्रकारे तलाव बंद करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेच पाहिजे असं सांगितलं.


इतर तलावही बंद?

शिरवाडकर यांनी कृत्रिम तलावाची सूचना केल्यामुळे हा धागा पकडून राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी मुंबईत जे ३१ कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन केलं जातं, त्यातील गणेशमूर्तींचं काय होतं, त्या पुन्हा समुद्रात का विसर्जित केल्या जातात, असा सवाल करत याची माहिती सादर केली जावी, अशी सूचना केली. यावर अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, लोकप्रतिनिधींना डावलून प्रशासनाने कोणताच निर्णय घेऊ नये असे निर्देश देत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला. मात्र, जैन आणि गुजराती समाजावरील प्रेमापोटीचं भाजपाने या तलावातील गणेशमूर्तींचं विसर्जनाचं समर्थन केलेलं असून अशाप्रकारे भविष्यात मालाडमधील शांताराम तलाव, कुर्ला येथील शीतल तलावही बंद केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हेही वाचा -
 

शिक्षकांना चॅनेलवरुन देण्यात येणारं प्रशिक्षण मराठीतच - विनोद तावडे

सर्जिकल स्ट्राईक दिन पाळा, यूजीसीचे काॅलेज, विद्यापीठांना आदेश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा