Advertisement

आवाज बंद कर डिजे तुला बाप्पाची शपथ हाय!


आवाज बंद कर डिजे तुला बाप्पाची शपथ हाय!
SHARES

आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ हाय...डिजेच्या तालावर थिरकत बाप्पाला अखेरचा निरोप द्यायच्या तयारीत असलेल्या सार्वजनिक मंडळांनो सावधान! कारण डिजे लावत विसर्जन करणार असाल आणि या डिजेच्या आवाजाने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाले असेल तर तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल. आणि याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. ही कडक भूमिका घेतली आहे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने!

डिजेच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण वाढत असून दरवर्षी मंडळांच्या मागे कारवाईचा ससेमिरा लागत आहे. त्यामुळे यंदा समन्वयक समितीने सर्व सार्वजनिक मंडळांना डिजेऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, आवाजाची पातळी सांभाळत बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मोठ्या संख्येने मंडळांनी डिजेला बाद करत पारंपरिक वादय लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा ध्वनीप्रदुषण कमी होईल असा दावा समन्वयक समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे.

यंदा सार्वजनिक मंडळांनी डिजेला काट मारण्यासारखे विशेष प्रयत्न केले असतील, तर हे खरेच स्वागतार्ह आहे. पण प्रत्यक्षात विसर्जनाच्या दिवशी काय परिस्थिती असेल, यावर आमचे लक्ष असेल.

सुमेरा अब्दुलअली, अध्यक्षा, आवाज फाऊंडेशन

विसर्जनाच्या दिवशी ६० ते ६५ डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी राखण्याची गरज असताना ही पातळी १०० डेसिबलचा आकडा पार करत असल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुमेरा अब्दुलअली यांनी दिली आहे. गेल्या वर्षी मुंबईत विसर्जनाला ११६ डेसिबलची पातळी होती आणि त्यातून ध्वनिप्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही सुमेरा अब्दुलअली यांनी सांगितले आहे. यंदाही दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळीही १०० डेसिबलवर आवाजाची पातळी गेल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता विसर्जनच्या शेवटच्या दिवशी आवाजाची पातळी काय असेल यावर आवाज फाऊंडेशनचे लक्ष असणार आहे.


 महागडी पारंपरिक वाद्य!

अंदाजे ८० टक्के मंडळांनी आवाहनाला साथ देत पारंपारिक वाद्यातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पारंपारिक वाद्यवृंद महाग असल्याने, त्यासाठी दीड-दीड लाख रुपये मंडळांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे केवळ आर्थिक अडचणींमुळे समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देता आला नसल्याचे अनेक मंडळांनी कळवले आहे.

नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समिती



हेही वाचा

ढोल, ताशाचा 'आवाज' डिजेवरही भारी, ध्वनी प्रदूषणात घातली भर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा