Advertisement

मुंबई: गोवर्धनने गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ केली

हा बदल 2 फेब्रुवारीपासून लागू झाला आहे.

मुंबई: गोवर्धनने गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ केली
SHARES

देशातील सर्वात मोठ्या खाजगी डेअरीपैकी एक आहे गोवर्धन ब्रँड... गोवर्धन दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. हा बदल 2 फेब्रुवारीपासून लागू झाला आहे.

यासह, गोवर्धन गोल्ड व्हेरियंटची किंमत आता 56 रुपये प्रति लीटर असेल. याआधी याची किंमत 54 रुपये होती. कंपनीने एका महिन्यात ब्रँडच्या दुधाच्या किंमतीत वाढ केली आहे. गोवर्धन मुंबईत दररोज 2.5 लाख लिटरहून अधिक गायीच्या दुधाची विक्री करतात.

पराग मिल्क फूड्सचे चेअरमन देवेंद्र शाह यांनी म्हटले की, "पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि पशुखाद्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे दूध उत्पादनाच्या एकूण खर्चात वाढ झाली आहे."

“आम्ही अमूलसारख्या मोठ्या ब्रँडच्या बरोबरीने आमचे दर वाढवले आहेत. आम्ही शेतकऱ्यांना जास्त खरेदी किंमत देत आहोत. बऱ्याच काळापासून दुधाचे दर इतके कमी होते की शेतकऱ्यांचा या व्यापारातील रुची कमी झाली होती. शिवाय, गेल्या आठ महिन्यांत आम्ही अतिवृष्टी, हिरव्या चाऱ्याचा तुटवडा आणि गुरांच्या चाऱ्याच्या मोठ्या खर्चाचा सामना केला आहे,” ते म्हणाले.

यापूर्वी, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने सर्व प्रकारांमध्ये अमूल पाऊच दुधाच्या किमती 3 प्रति लिटरने वाढवल्या आहेत.



हेही वाचा

वांद्रेतील 'या' मार्गावरील वाहतूक १७ फेब्रुवारीपर्यंत वळवली

माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवासही वातानुकूलित, सलून कोचची जोडणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा