Advertisement

पावसामुळे हार्बर, मध्य रेल्वे वाहतूक ठप्प, हायटाईडचा इशारा


पावसामुळे हार्बर, मध्य रेल्वे वाहतूक ठप्प, हायटाईडचा इशारा
SHARES

मुंबईत रविवारपासून सतत पडत असलेल्या पावसाने या मोसमातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही होताना दिसत आहे. वांद्रे रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या 25 ते 30 मिनिट उशिराने धावत आहेत. तर हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत कुलाबामध्ये 151 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 88.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पालिकेच्या वतीने पंपाच्या साहाय्याने पाणी काढण्याचे काम सुरू आहे.


मंगळवारी संध्याकाळी 4.35 वाजताच्या दरम्यान हाईटाईडचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सतर्कतेच्या दृष्टीकोनातून मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर ठिकठिकाणी नौदलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच वांद्रे वरळी सी लिंक पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.


हेही वाचा - 

मुंबईत तुंबली - रेल्वे ठप्प, रस्ते जाम !


संबंधित विषय
Advertisement