Advertisement

हार्बर रेल्वेच्या 'या' स्थानकातील पादचारी पूल खुला

हार्बर रेल्वे मार्गावरील 'हा' पादचारी पूल अखेर शनिवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.

हार्बर रेल्वेच्या 'या' स्थानकातील पादचारी पूल खुला
SHARES

हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावरील किंग्ज सर्कल (King circle) येथील पादचारी पूल (FOB) अखेर शनिवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मोठ्या दुरुस्तीसाठी हा पूल मागील ८ महिने बंद ठेवण्यात आला होता. २०१४ मध्ये महापालिकेनं (BMC) नेमलेल्या स्ट्रक्चर आॅडिटरमार्फत (Structural Audit) मुंबईतील सर्व पुलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये किंग्ज सर्कल येथील पादचारी पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची शिफारस करण्यात आली होती. मात्र, छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT) येथील हिमालय पूल (Himalaya Bridge) कोसळल्यानंतर सर्व पुलांचे पुन्हा आॅडिट (Audit) करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील (Dr. Baba Saheb Ambedkar Marg) २ पादचारी पूल जून, २०१९ पासून बंद करण्यात आले होते. यापैकी या मार्गावरील दक्षिणेकडील पूल सुरू करून प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. हिमालय पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची शिफारस करणाऱ्या डी. डी. देसाई (D. D. Desai) या स्ट्रक्चरल आॅडिटरनं किंग्ज सर्कल पुलाचीही किरकोळ दुरुस्तीची शिफारस केली होती.

हिमालय पादचारी पूल (Himalaya Bridge) कोसळल्यानंतर महापालिकेनं जून २०१९मध्ये किंग्ज सर्कल येथील दोन्ही पादचारी पूल बंद केले. त्यामुळं रेल्वे स्थानकावर (Railway Station) जाण्यास प्रचंड गैरसोय होत असल्यानं प्रवाशांनी निदर्शनंही केली. मात्र, पुन्हा आॅडिट केल्यानंतर डॉ. आंबेडकर मार्गावरील (Dr. Baba Saheb Ambedkar Marg) दक्षिणेकडील पुलाची मोठी दुरुस्ती, तर दुसऱ्या पादचारी पुलाची (FOB) पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती.

धोकादायक ठरलेल्या २९ पुलांची पुनर्बांधणी, ४७ पुलांची मोठी दुरुस्ती आणि १८४ पुलांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ७९९़६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दोन्ही पादचारी पूल २ दशकांपूर्वी बांधण्यात आले आहेत. मात्र, यापैकी एका पुलाची मोठी दुरुस्ती तर दुसऱ्याच्या पुनर्बांधणीची शिफारस करण्यात आली आहे. किंग्ज सर्कल येथील दक्षिणेकडील पुलाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात असून, केवळ किरकोळ कामं शिल्लक आहेत. मात्र, पूल बंद असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून पादचारी विशेषत: प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे हा पूल शनिवारी तातडीनं सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड फायदेशीर

दाऊदला आणखी एक धक्का, तारिक परवीनला अटकसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा