Advertisement

मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सज्ज

मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त
SHARES

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं चार शेतकऱ्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारला आहे. मुंबई पोलिस (Mumbai Police) सोमवारी रस्त्यांवर जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करतील, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

महा विकास आघाडी (MVA) सहयोगी- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने हा बंद पुकारला आहे.

"राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) ३ कंपन्या, ५०० होमगार्ड जवान आणि स्थानिक शस्त्रास्त्र युनिट्समधील ४०० जवान आधीच नवरात्रोत्सवाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून तैनात आहेत. पण, बंद लक्षात ठेवून मुंबई पोलीस कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करतील.”

शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सांगितलं की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रातील ११ ऑक्टोबरच्या बंदमध्ये पूर्ण ताकदीनं सहभागी होईल. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या "शेतकरी विरोधी" धोरणांविरुद्ध लोकांना जागृत करणं आवश्यक आहे.

रविवारी मध्यरात्रीपासून बंदची अंमलबजावणी केली जाईल. नावब मलिक यांनी म्हटलं की, “आम्ही सर्व कामगारांना आवाहन करतो की बंद दरम्यान हॉस्पिटल, रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा, दुध पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी कोणतीही समस्या निर्माण करू नयेत."

व्यापारी संघटनांनी सोमवारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड व्यापारी संघटनेनं सोमवारी सर्व फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार बंद राहतील असे जाहीर केले आहे.

व्यापारी संघटनेनंही सर्व सदस्यांना सोमवारी आपला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उत्पादन सोमवारी बाजारात आणू नये असं आवाहन केलं आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र बंद! जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

महाराष्ट्र बंदमध्ये ‘ही’ व्यापारी संघटना नाही होणार सहभागी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा