Advertisement

मुंबईत पावसाचा जोर कायम


मुंबईत पावसाचा जोर कायम
SHARES

गेल्या तीन दिवसांपासून हवामान खात्याकडून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र पाऊस दडी मारून बसल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. अखेर मंगळवारी दुपारी मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. 

ढग दाटून आल्याने शहर, उपनगरात भर दुपारीही काळोख पसरला असून गडगडाटी वादळवाऱ्यासह पुढील ६ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, गरज असेल तरच बाहेर पडा, अशी सूचनाही हवामान खात्याने केली आहे.

दुपारी दोन वाजल्यापासून मुंबई, उपनगरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. वरळी, दादर, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरीसह ठाणे आणि डोंबिवलीतही दुपारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर पवई, कांजूरमार्ग, साकीनाका या भागातही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे.


पुढील ६ तास मुंबई-उपनगरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून त्यानंतरही पुढील २४ तास पावसाची रिपरिप सुरूच राहिल, असेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


हार्बर विस्कळीत

मुंबईत पावसाला सुरूवात झाल्याबरोबर रेल्वे सेवा विस्कळीत झाली नाही तरच नवल. त्यानुसार दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरूवात झाल्याबरोबर काही मिनिटांत हार्बर सेवा विस्कळीत झाली आहे. सांताक्रूझ ते विर्लेपार्ले दरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास डाऊन हार्बर मार्गावर झाड पडल्याने हार्बर सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसटी ते वांद्र्यापर्यंतच लोकल ट्रेन धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा