हर्बल हुक्का पार्लरवर बंदी नाहीच- हायकोर्ट

हर्बल हुक्का पार्लरला तंबाखूजन्य पदार्थांसाठीचे नियम लागू होत नसल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात हर्बल हुक्का पार्लर चालवण्यास एकप्रकारे मोकळी वाट करून दिली आहे.

SHARE

हर्बल हुक्का पार्लरला तंबाखूजन्य पदार्थांसाठीचे नियम लागू होत नसल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात हर्बल हुक्का पार्लर चालवण्यास एकप्रकारे मोकळी वाट करून दिली आहे. यामुळे हर्बर हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टाॅरंट मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कमला मिल कंपाऊंड परिसरातील वन अबोव्ह आणि मोजेस बिस्ट्रो या पब्जला लागलेल्या आगीनंतर राज्य सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनावर बंदी कायद्यात (COTPA) सुधारणा करत हुक्का पार्लरवर बंदी आणली. त्याविरोधात शीशा रेस्टाॅरंटचे चालक अली रेझा आब्दी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत आमच्या हुक्का पार्लरमध्ये तंबाखूमुक्त हुक्का दिला जातो. त्यात ग्लिसरिन आणि साखरयुक्त पदार्थ असतात, असा दावा करण्यात आला होता. शीशा ब्रँडचे ३ रेस्टाॅरंट आहेत. त्यात ४०० जण काम करतात.  

या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने जोपर्यंत हुक्का पार्लरमध्ये तंबाखूजन्य पदार्थ दिले जात नाहीत, तोपर्यंत कारवाई करण्याचा राज्य सरकारला अधिकार नसल्याचं म्हटलं.  

तंबाखूजन्य हुक्क्याच्या तुलनेत हर्बर हुक्क्यामुळे कमी प्रमाणात नशा होत असली, तरी त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम नाकारता येणार नाहीत, असंही म्हटलं जात आहे.  


 हेही वाचा-

मुंबईतल्या या '५' लेण्यांमध्ये झळकतो इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी हे '५' उपाय उपयुक्तसंबंधित विषय
ताज्या बातम्या