Advertisement

हिंदमाता उड्डाणपूल परिसरातील रस्त्याची उंची 'इतक्या' मीटरने वाढली

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवून केलेल्या कामाचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलं.

हिंदमाता उड्डाणपूल परिसरातील रस्त्याची उंची 'इतक्या' मीटरने वाढली
SHARES

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवण्यात आल्याने यापुढं सखल भागात पाणी साचून होणारी वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यास मदत होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी व्यक्त केला.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवून केलेल्या कामाचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. रस्त्याची उंची सध्याच्या पातळीपेक्षा १.२ मीटरने वाढविण्यात आली आहे. लोकार्पण कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू, उपायुक्त विजय बालमवार आदी उपस्थित होते.

अधिक पावसामुळे (mumbai rain) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता परिसरातील सखल भागात पाणी साचल्यावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असे. हा अनुभव लक्षात घेऊन महानगरपालिकेमार्फत (bmc) येथील १८० मीटरच्या रस्त्याची उंची सध्याच्या पातळीपेक्षा १.२ मीटरने वाढविण्यात आली आहे. या रस्त्याचं शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलं. यामुळे पूरजन्य परिस्थितीतही वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

गांधी मार्केट येथील मिनी पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी

महात्मा गांधी मार्केट येथील लघु उदंचन केंद्राच्या (मिनी पंपिंग स्टेशन) सुरू असलेल्या कामाचीही आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांद्वारे प्रति मिनिट २.३३ लक्ष लिटर पाणी उपसण्याची क्षमता निर्माण होणार आहे. 

पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याने या पंपिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले.

(hindmata flyover road height increase by bmc due to water logging problem in mumbai in heavy rain)


हेही वाचा-

मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून तब्बल ५८ कोटींचा दंड वसूल

संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा