Advertisement

३१ डिसेंबरसाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर

राज्याच्या गृहखात्यानं नवं वर्षांच्या स्वागतासाठी एक नियमावली जाहीर केली आहे.

३१ डिसेंबरसाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर
SHARES

राज्याच्या गृहखात्यानं एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व नियम देण्यात आले असून नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणानं साजरे करावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

काय आहे नियमावली?

  • नव्या वर्षाच्या स्वागातील नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणानं साजरे करावे
  • राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली असून याचं पालन करावं.
  • नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहाच आसनक्षमतेच्या ५० टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे.
  • कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. तसंच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
  • आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी निर्जंतूरीकरणाची व्यवस्था करावी
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या, आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं.
  • ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावं.
  • नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
  • फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

दरम्यान, महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सांगितलं की, मुंबईत दिवसभरात कोविड -१९ प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांनी २,०००चा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

“गेल्या आठवड्यात, आम्ही दररोज १५० प्रकरणं नोंदवत होतो. आता, आम्ही दररोज सुमारे २,००० प्रकरणे नोंदवत आहोत. मुंबईत आज २,००० प्रकरणे ओलांडू शकतात,” असं शहराच्या पालकमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं.

या बैठकीला पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते.



हेही वाचा

मुंबईत आज रुग्णांचा आकडा २०००च्या वर जाण्याची शक्यता - आदित्य ठाकरे

मुंबईत पार्ट्यांवर बंदी, इमारतीही सील, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा