Advertisement

मुंबईत पुढील २ दिवस अतिवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवेमुळं शनिवारी आणि रविवारी मुंबईसह किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबईत पुढील २ दिवस अतिवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
SHARES

समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवेमुळं शनिवारी आणि रविवारी मुंबईसह किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहेत्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. सध्यस्थितीत मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.

९६ टक्के पाऊस

पावसाळाच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये देशात ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. देशात या २ महिन्यांमध्ये सरासरीच्या ४९ टक्के पाऊस पडतो़ यापूर्वी हवामान विभागाने जून ते सप्टेंबर दरम्यान ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला होता. गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे.

तलाव ओव्हर फ्लो

सध्यस्थितीत मुंबईत दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल, लालबाग, परळ, जोगेश्वरी, अंधेरी, मालाड, बोरिवलाी या भागांत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलाव क्षेत्रांतही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळं तलावही ओव्हर फ्लो झाले आहेत.हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८५.६८ टक्के पाणीसाठा जमा

कर्ज फेडण्यासाठी महापालिकेची बेस्टला १२०० कोटींची मदतRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा