Advertisement

करप्रकरणी सचिनला मिळाला मोठा दिलासा


करप्रकरणी सचिनला मिळाला मोठा दिलासा
SHARES

मुंबईतील आयकर न्यायाधीकरण विभागा(आयटीएटी)नं एका जुन्या प्रकरणात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या बाजूने निर्णय देत त्याला दिलासा दिला आहे.


काय आहे प्रकरण?

हे प्रकरण सन २०१२-१३ या आर्थिक वर्षातील आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावे पुण्यात सफायर आणि ट्रेजर पार्क या गृहप्रकल्पात २ फ्लॅट आहेत. हे फ्लॅट भाड्याने देऊन उत्पन्न मिळवल्याबद्दल त्याला या आर्थिक वर्षात प्राप्तिकर विभागाकडून करवसुलीची नोटीस पाठवण्यात आली होती. सचिनने २०१२-१३ या आर्थिक वर्षांत ६१.२३ कोटींची कमाई केल्याचं 'आयटीएटी'ने गेल्या आठवड्यात काढलेल्या ऑर्डरमध्ये म्हटलं होतं.



सचिनचा दावा काय ?

परंतु या आर्थिक वर्षांत आपल्याला एका फ्लॅटमधून दरमहा १५ हजार रुपये भाडं मिळालं. तर भाडेकरी न मिळाल्याने दुसरा फ्लॅट रिकामा ठेवला होता. त्यामुळे आयकर विभागाच्या १९६१ च्या सेक्शन २३(१)(सी) नुसार रिक्तता अलाऊन्स मिळावा, असा दावा सचिनने केला होता.


न्यायाधीकरणाचा निकाल

हे प्रकरण मुंबईतील आयकर न्यायाधीकरण विभागा(आयटीएटी) कडे आल्यावर न्यायाधीकरणाने सचिनचा दावा मान्य करत त्याला दिलासा दिला. आर्थिक वर्षात एखाद्या मालमत्तेतून कोणतंही उत्पन्न मिळालं नसेल तर करदात्याला रिक्तता अलाउन्सनुसार सूट दिली जाते. 'आयटीएटी'ने सचिनला पुण्यातील एका फ्लॅटमधून शून्य उत्पन्न मिळाल्याचं मान्य केल्याने त्याला करापोटी १.३ लाख रुपये भरावे लागणार नाहीत.



हेही वाचा-

सर्वात इनोव्हेटिव्ह शहरांच्या यादीत मुंबई 92 व्या स्थानी

मुंबई देशातलं सर्वात महागडं शहर!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा