Advertisement

का वाढल्या मसाल्यांच्या किंमती? वाचा

नुकत्याच केरळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे मसाल्यांच्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे मुंबईसह इतरत्र सर्व ठिकाणी मसाल्यांची आवक घटली. परिणाम स्वरुप मसाल्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या.

का वाढल्या मसाल्यांच्या किंमती? वाचा
SHARES

खाद्यपदार्थांना चवदार आणि चटपटीत बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याला कारणही तसंच आहे. नुकत्याच केरळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे मसाल्यांच्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे मुंबईसह इतरत्र सर्व ठिकाणी मसाल्यांची आवक घटली. परिणाम स्वरुप मसाल्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या.

मसाल्याच्या पदार्थांच्या उत्पादनामध्ये केरळचा देशात पहिला क्रमांक लागतो. दरवर्षी केरळमधून महाराष्ट्रात काळी मिरी, हिरवी वेलची, तेजपत्ता, जायफळ, लवंग, आलं, जावंती आणि दालचिनी यांसारख्या मुख्य मसाल्यांची आयात होते. मात्र, केरळमध्ये उद्भवलेल्या आपत्तीमुळे मसाल्यांच्या पदार्थांचं उत्पादन घटल्याने त्यांची आवाकही कमी झाली आहे. याचे परिणाम मुंबईत मसाले पदार्थांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग बाजारात दिसून येत आहेत.


लालबाग बाजारातील किंमती

  • काळी मिरी  १००० रुपये किलो 
  • हिरवी वेलची १८०० रुपये किलो
  • चहा पावडर १८०० रुपये किलो 
  • जायफळ १२०० रुपये किलो

याव्यतिरिक्त दालचिनी, लवंग, बडीशेब, खोबरे, वेलदोडे, आणि खसखस यांच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे.


खोबऱ्याच्या किंमतीतही वाढ

सुक्‍या खोबऱ्यासाठी तमिळनाडू, कर्नाटक, कोकणसह केरळही अग्रेसर आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे केरळमधील नारळाची झाडं उन्मळून पडल्यानं लालबाग मार्केटमधील खोबऱ्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे मसाल्यांच्या किंमतीसह सुक्या खोबऱ्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळं सुक्या खोबऱ्याची किंमत 200 रुपये किलो झाली आहे.

केरळमधील पुरामुळे मसाल्यांच्या किंमती वाढल्या आहेत. केरळमधून येणारे मसाले यावेळी खूप कमी प्रमाणात आल्याने यांच्या किमती वाढल्या आहेत. खरंतर मसाले बनवण्याचा हा सिझन नाही. जानेवारी ते एप्रिल या महिन्यात मसाले मोठ्या प्रमाणात बनवले जातात. त्यामुळ मसाले पदार्थांची अवाक अशीच राहिली तर पुढील जानेवारी ते एप्रिल महिन्यात मसाल्यांच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

- अशोक खामकर, व्यापारी


हेही वाचा - 

वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी जे.जे.तील डाॅक्टर शिकले मल्याळम!

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला एफडीएही, १ लाख रुग्णांसाठी पाठवणार औषधं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा