Advertisement

वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी जे.जे.तील डाॅक्टर शिकले मल्याळम!

मुंबईहून दाखल झालेले डाॅक्टर तिथं २४x७ सेवा देत आहेत. परंतु ही सेवा देताना संपूर्ण आठवडाभर डॉक्टरांना खण्या-पिण्यासह भाषेच्या समस्येला सामोरं जावं लागलं. यावर मात करण्यासाठी जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी मल्याळम भाषा शिकून स्थानिकांशी संवाद साधायला सुरूवात केली.

वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी जे.जे.तील डाॅक्टर शिकले मल्याळम!
SHARES

केरळमध्ये पूरपरिस्थिती नियंत्रणात आली असली, तरी देखील राज्याच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्य साथीच्या आजारांनी त्रस्त शेकडो रुग्ण येत आहेत. केरळमधील रहिवाशांना वैद्यकीय मदत देण्यासाठी मुंबईहून दाखल झालेले डाॅक्टर तिथं २४x७ सेवा देत आहेत. परंतु ही सेवा देताना संपूर्ण आठवडाभर डॉक्टरांना खण्या-पिण्यासह भाषेच्या समस्येला सामोरं जावं लागलं. यावर मात करण्यासाठी जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी मल्याळम भाषा शिकून स्थानिकांशी संवाद साधायला सुरूवात केली. यामुळे त्यांच्यापुढील अडचणीचा डोंगर सहज दूर झाला.


१०० डाॅक्टरांची टीम

'देवभूमी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या केरळला काही दिवसांपूर्वी पावसाचा तडाखा बसला. या भीषण आपत्तीत ४०० पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला असून तिथं राहणाऱ्या लोकांच्या मालमत्तेचंही अतोनात नुकसान झालं आहे. त्याशिवाय जवळपास २ लाख कुटुंबं बेघर झाली असून या पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी महाराष्ट्रातून १०० डॉक्टरांची टीम सोमवारी २० ऑगस्टला रवाना झाली. त्यात मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयातील ५० डाॅक्टरांचा समावेश आहे.



'या' अडचणीना सामना

केरळमधील बहुतांश लोकांची भाषा मल्याळम आहे. ही भाषा महाराष्ट्रातील डॉक्टरांना येत नसल्याने रूग्णांची भाषा समजून त्यांच्यावर वेळीच उपचार करता यावे, यासाठी काही दुभाषक (ट्रान्सलेटर) पुरवण्यात आले आहेत. परंतु हे दुभाषक प्रत्येक वेळेस प्रत्येक डाॅक्टरांच्या सोबत नसल्याने डाॅक्टरांना स्थानिकांसोबत संवाद साधण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यावर मात करण्यासाठी जे.जे. रुग्णालयातील डाॅक्टरांनी दुभाषकाच्या मदतीने महत्त्वाचे शब्द लिहून घेत स्थानिकांसोबत मल्याळममधून संवाद साधण्यास सुरूवात केली. तर काही डाॅक्टरांनी संवाद साधण्यासाठी जुजबी मल्याळम शिकून घेतली.


२० हजारांहून जास्त रुग्णांना सेवा

डॉक्टरांचं काम २७ ऑगस्टला पूर्ण झाल्याने ही सर्व टीम मुंबईत परतणार आहे. या डॉक्टरांनी आतापर्यंत २० हजार पेक्षा जास्त रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवल्या आहेत. सध्या केरळ मधील वैद्यकीय सेवा पूर्ववत झाल्यानेच ही टीम माघारी परतत आहेत.



गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये महापुरानं हाहाकार माजवाल्याने आम्ही तिथे वैद्यकीय सेवा पुरवत होतो. जोपर्यंत तिथली परिस्थिती आटोक्यात येणार नाही, तोपर्यंत केरळमध्येच थांबून ही वैद्यकीय मदत सुरूच ठेवण्याचा निर्धार सर्वांनी केला होता. शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं, म्हणूनच आम्ही सर्वांनी संवाद साधण्यापुरती मल्याळम भाषा शिकली. त्यमुळे आमचं काम खूपच सोपं झालं.
- डॉ. आकाश माने, जे. जे. रुग्णालय



हेही वाचा-

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीला एफडीएही, १ लाख रुग्णांसाठी पाठवणार औषधं

केरळमधील पूरग्रस्तांना विविध संस्था, रुग्णालयांकडून मदत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा