Advertisement

Avighna Park Fire : फायर ऑडिट होऊनही इमारतीला आग?

avighna park इमारत बांधताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही आता केला जातोय.

Avighna Park Fire : फायर ऑडिट होऊनही इमारतीला आग?
SHARES

करी रोड इथल्या वन अविघ्न पार्क (Avighna Park Fire) इमारतीला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली होती. यात एखाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.

आता या इमारती संदर्भात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. ही इमारत बांधताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही आता केला जातोय. 

आराखड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित

  • या इमारतीचं बांधकाम २००६ पासून सुरू झालं. यात ४६ कमर्शिअल गाळे आहेत.
  • मुख्य आराखड्यात छेडछाड करुन चारचा वाढीव एफएसआय घेतल्याचा आरोप होतोय. नियमानुसार १.३३ चा एफएसआय मिळायला हवा होता.
  • माजी महापालिका आयुक्त सीताराम कुंटेनी या प्रकल्पावर आक्षेप घेतला होता. हा बिल्डर स्वत:लाच रिहॅब करत आहे, असा आक्षेप सिताराम कुंटेंनी घेतला होता.
  • हाय पॉवर कमिटीकडून जादा एफएसआयबाबत आक्षेप घेतला गेला होता. या प्रकल्पामुळे ४६ कमर्शिअल गाळ्यांचं पुनर्वसन झालंच नाही, असंही बोललं जातंय.
  • यानंतर अजॉय मेहता आयुक्त झाले. या काळात प्रकल्पाला गती मिळाली.


फायर ऑडिट होऊनही...

  • वन अविघ्ना पार्क हा क्लस्टर रिडेव्हलमेंटचा प्रोजेक्ट होता. २.५ लाख स्केअर फुटाचं हे बांधकाम आहे.
  • १० वर्षांपूर्वी ही इमारत बांधली होती. ७-८ वर्षांपूर्वी या इमारतीत लोक रहायला आले.
  • २०११ मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू असताना क्रेन पडली होती. यात बाजूच्या ६ घरांचं क्रेन पडल्यानं नुकसान झालं होतं.
  • महिन्याभरापूर्वी गणेशउत्सवादरम्यान याच इमारतीच्या भागात आग लागली होती. तेव्हा फायर ऑडीट झाल्याचंही बोललं जातंय.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीसाठी किशोरी पेडणेकर यांनी सोसायटी मॅनेजमेंटला जबाबदार धरलं आहे.

सोसायटीतले लोक सांगतायत त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किगमध्ये ठेवलं जात नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसतायत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.हेही वाचा

करीरोड परिसरात इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा