Advertisement

राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी घट


राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी घट
SHARES

राज्यात दिवाळीनंतर थोडा वाढलेला कोरोनाचा आलेख आता पुन्हा घसरणीला लागला आहे. रविवारी दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. दिवसभरात  ४० जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं असून ७ हजार ४८६ जणांनी कोरोनावर मात केली.

हेही वाचाःः माहीम परिसरात फुटली जलवाहिनी; 'या' परिसरात पाणीपुरवठा नाही

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा १७ लाख २३हजार ३७० वर गेला आहे. तर Recovery Rate ९३.०४ एवढा झालाय. गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ७५७ नव्या रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या ही १८ लाख ५२ हजार २६६ एवढी झालीय. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही ८० हजारांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही घसरण सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे. फायझर (Pfizer) ने विकसित केलेल्या कोरोना लशीच्या (Coronavirus Vaccine) वापराला भारतात परवानगी मागितली आहे. कंपनीच्या भारतीय शाखेने याबाबतचा अर्ज भारतीय औषधी महानियंत्रक DCGI (डीसीजीआई) कडे केला आहे. मात्र हा अर्ज करताना कंपनीने जी अट घातली त्या अटीमुळे सर्व घोडं अडलं असून त्यामुळे फायझरच्या लशीला (Pfizer corona Vaccine) परवानगी मिळण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा