Advertisement

दोस्ती बिल्डर विरोधात 'त्या' रहिवाशांची कोर्टात धाव

अॅन्टाॅप हिल परिसरातील लॉइड्स इस्टेटच्या इमारत दुर्घटनेनंतर शुक्रवारी २९ जूनला दोस्ती बिल्डर विरोधात इमारतीच्या रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दोस्ती बिल्डर विरोधात 'त्या' रहिवाशांची कोर्टात धाव
SHARES

अॅन्टाॅप हिल परिसरातील लॉइड्स इस्टेटच्या इमारत दुर्घटनेनंतर शुक्रवारी २९ जूनला दोस्ती बिल्डर विरोधात इमारतीच्या रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी २७ जूनला महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या इमारतीसमोर आंदोलन करत रहिवाशांनी दोस्ती बिल्डरच्या दिपक गरोडिया, किसन गरोडिया, राजेश शहा या तिघांना लवकरात लवकर अटक करा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु अशी मागणी केली होती.


नुकसानभरपाईची मागणी

त्यांनतर शुक्रवारी दोस्ती बिल्डर विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करत घडलेल्या संपूर्ण प्रकरणात इमारतीच्या नुकसानाची भरपाई द्या, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसंच शेजारील इमारतीच्या बांधकामाला स्थगिती असतानाही बांधकाम केल्यानं इमारतीच्या काही भागाला तडे गेले आहे. त्यामुळं या ठिकाणी राहणं धोकादायक असल्याचा दावाही रहिवाशांनी केला आहे.


नेमकं प्रकरण काय?

सोमवारी २५ जूनला पहाटे चारच्या सुमारास पाऊस कोसळत असताना अचानक वडाळ्यातील अॅन्टाॅप हिल भागातील लॉइड्स इस्टेट इमारतीची संरक्षक भिंत अचानक कोसळली. जमीन खचून झालेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात सुमारे १० ते १२ गाड्या अडकल्या, परंतु सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल नाही.


महापालिकेकडे तक्रार

ही संपूर्ण दुर्घटना या इमारतीच्यासमोर ५० मजली इमारतीचा पाया खोदण्यासाठी सुरू असलेल्या कामामुळं झाली. या इमारतीजवळ खोदकाम करण्यास लॉइड्स सोसायटीनं वारंवार आक्षेप घेतल असून त्याबाबत या रहिवाशांनी अॅन्टाॅप हिल पोलिस ठाणे, मुंबई महापालिका वॉर्डाकडे तक्रारी दाखल केल्या, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.


बांधकाम परवाना रद्द

बुधवारी २७ जूनला येथील रहिवाशांनी महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या इमारतीसमोर केलेल्या आंदोलनानंतर, दोस्ती बिल्डरला या ठिकाणी बांधकामासाठी दिलेल्या सर्व परवानगी रद्द करण्यात आल्या. तसंच जोपर्यंत लॉइड्स इस्टेट, दोस्ती ब्लॉस्म, कारनेशन, डिफोडिल्स या चारही इमारतींना असलेला धोका पूर्णपणे टळत नाही तोपर्यंत हे बांधकाम थांबवण्यात यावं, असे आदेशही महापालिका प्रशासनाने दोस्ती बिल्डरला दिले आहेत.हेही वाचा-

'ती' ३२ मजली इमारत राहण्यास योग्य?

दोस्ती बिल्डरला अटक करा, लॉयड्स इस्टेटच्या रहिवाशांची मागणीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा