Advertisement

१ मे नंतरही लाॅकडाऊन वाढणार? काय म्हणाले मंत्री?

एकीकडे कोरोनाचं संकट महाराष्ट्रात गहिरं होत असतानाच १ मे पासून लसीकरणाच्या नव्या टप्प्यालाही सुरूवात होत आहे. अशा परिस्थितीत हे निर्बंध मागे घेण्यात येतील की पुढे सुरूच राहतील, यावर चर्चा सुरू झाली आहे.

१ मे नंतरही लाॅकडाऊन वाढणार? काय म्हणाले मंत्री?
SHARES

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना प्रवास करण्यास आणि सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हे निर्बंध  १ मे सायकांळ ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. मात्र यानंतर हे लाॅकडाऊन वाढवण्यात येईल की निर्बंध मागे घेण्यात येतील, यावर चर्चा सुरू आहे.

कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने सुरूवातील अल्टिमेटम देऊन राज्य सरकारने ५ एप्रिलपासून विकेंड लाॅकडाऊन लागू केलं होतं. परंतु सोमवार ते शुक्रवार दरम्यान देखील स्थानिक बाजारपेठा, दुकानं, बंद ठेवण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी मोठी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर, १४ एप्रिलपासून या निर्बंधांमध्ये काही बदल करुन आणखी निर्बंध कडक करण्यात आले.

कलम १४४ अंतर्गत संचारबंदी सुरू असतानाही लोकांची वर्दळ कमी होत नसल्याने, २२एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरी प्रवासावरही बंदी घालण्यात आली. तसंच, लोकल आणि बससेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली. येत्या १ मेपर्यंत ही नवीन नियमावली लागू राहणार आहे.

हेही वाचा- “कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणण्याची इच्छा नव्हती पण; ही लाट प्रचंड मोठी”

एकीकडे कोरोनाचं संकट महाराष्ट्रात गहिरं होत असतानाच १ मे पासून लसीकरणाच्या नव्या टप्प्यालाही सुरूवात होत आहे. अशा परिस्थितीत हे निर्बंध मागे घेण्यात येतील की पुढे सुरूच राहतील, यावर चर्चा सुरू झाली आहे. 

त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील निर्बंध यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता आहे. बुधवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यामध्ये, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असं वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

त्यामुळे सर्वसामान्यांना इतक्यात तरी लाॅकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचं दिसत आहे.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा