चेंबूरमध्ये गॅस पाईपलाईन फुटल्याने सायन-पनवेल मार्ग ठप्प

  मुंबई  -  

  चेंबूर नाका येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाबाहेर एलपीजीची गॅस पाईपलाईन फुटली. सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरू झाली. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गॅसची मोठ्या प्रमाणत गळती होत असल्याने पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. अखेर भारत पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांनी गॅस पाईपलाईन बंद केल्यानंतर दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

  यापूर्वीही दिंडोशी आणि मुलुंडमध्ये महानगर गॅस लिमिटेडची पाईपलाईन फुटण्याचा प्रकार घडला होता. मालविहार रोडमधील गटाराच्या दुरुस्तीचे काम पालिकेतर्फे सुरू असताना ही पाईपलाईन फुटली होती. पालिका कामगारांच्या हलगर्जीपणामुळे गॅसची पाईपलाईन फुटली आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होण्यास सुरुवात झाली होती.  हेही वाचा -

  गॅस पाइपलाइनच्या गळतीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जाम

  सिलिंडर स्फोटानं घेतले मानखुर्दमध्ये 3 बळी


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.