Advertisement

Maharashtra Budget 2022: नवी मुंबईत उभारणार महाराष्ट्र भवन

अर्थमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Budget 2022: नवी मुंबईत उभारणार महाराष्ट्र भवन
SHARES

मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबई इथं महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून आज (शुक्रवार)राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी त्यांनी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी राखून ठेवला असल्याची घोषणा केली.

”महाराष्ट्र सरकारनं लता दिनानाथ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठातील कलिना येथील प्रांगणात जागा निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.” अशी माहिती अजित पवार यांनी आपल्या भाषणात दिली.



हेही वाचा

maharashtra"="" target="_blank">Maharashtra Budget 2022: महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार">Maharashtra Budget 2022: महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार

Maharashtra Budget 2022 : आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा