Advertisement

ठरलं! मुख्यमंत्री उद्या करणार कडक लाॅकडाऊनची घोषणा!

राज्यातील कोरोना संसर्गाची बिघडत चाललेली स्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन लागू करावाच लागेल, यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

ठरलं! मुख्यमंत्री उद्या करणार कडक लाॅकडाऊनची घोषणा!
SHARES

राज्यातील कोरोना संसर्गाची बिघडत चाललेली स्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन लागू करावाच लागेल, यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) बुधवार २१ एप्रिल रोजी करणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांची संचारबंदी लागू केली होती. मात्र जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक आणि आवश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या होत्या. परंतु कलम १४४ लागू असूनही मोठ्या प्रमाणात नागरिक घरातून बाहेर पडत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण जराही कमी झालेलं नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरताना दिसत आहे. 

परिणामी राज्यात बेड्स, आॅक्सिजन, औषधांचा तुडवडा होऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. याहून भयंकर बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. वर्षभरापासून अथक काम करणारे डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही काही मर्यादा आहेत. संसर्गाची साखळी तोडायची असल्यास गर्दीला रोखावंच लागेल, असं अनिल परब (anil parab) यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- अखेर राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

कोरोना संसर्गाला (coronavirus) आवर घालण्यासाठी किमान १५ दिवसांच्या कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेतलाच पाहिजे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, अशी मागणी बहुतेक सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीत केली. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कडक लाॅकडाऊनसाठी तयार झाल्याचं म्हटलं जात आहे. हा लाॅकडाऊन बुधवार रात्री ८ वाजेपासूनच जाहीर करावा, अशीदेखील मंत्र्यांनी मागणी केली आहे.

त्यामुळे हा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री रात्री ८ वाजेच्या सुमारास राज्यातील जनतेशी संवाद साधून कडक लाॅकडाऊनची घोषणा करतील, असं म्हटलं जात आहे. या लाॅकडाऊनअंतर्गत जिल्हाबंदी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनसोबतच इतर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद होणार की नाही याबाबत नवीन गाइडलाईन्स तयार करण्यात येत आहे.

(maharashtra cm uddhav thackeray might declare strict lockdown by wednesday due to covid 19 pandemic)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा