Advertisement

राज्य सरकार जीम पुन्हा सुरू करण्याच्या विचारात : राजेश टोपे

मंगळवारी जीम मालक, बॉडीबिल्डर्स आणि फिटनेस प्रशिक्षकांच्या शिष्टमंडळानं मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्य सरकार जीम पुन्हा सुरू करण्याच्या विचारात : राजेश टोपे
SHARES

राज्य सरकार जीम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय लवकरच घेईल. त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती देखील तयार केली जाईल, असं सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला जाईल आणि तेच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील.

मंगळवारी जीम मालक, बॉडीबिल्डर्स आणि फिटनेस प्रशिक्षकांच्या शिष्टमंडळानं मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी त्यांना सांगितलं की "तुम्ही तुमच्या जीम पुन्हा सुरू करा. पुढे जे काही होईल ते आपण पाहू. जिम चालकांनी देखील सर्व नियमांचं पालन करावं.”

राज ठाकरे पुढे हे देखील म्हणाले की, बाजार सुरु आहेत. सगळीकडे सगळया गोष्टी सुरु आहेत. मूर्खाचा बाजार सुरु आहे. केंद्र सरकार सांगतं सुरु करा, राज्य सुरु करायला तयार नाही. केंद्र सरकारनं जीम आणि विमानतळ सुरू करायला सांगितलं आहे. राज्य नकार देत आहे. राज्य सरकारला काही वेगळी अक्कल आहे का? असा संतापही राज यांनी व्यक्त केला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरातील व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊनमुळे अर्थचक्राचं रुतलेलं गाडं पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी मे महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली. अटी-शर्थींचं पालन करून अनेक उद्योग-व्यवसायांना परवानगी देण्यात आली.

केंद्र सरकारनं नुकत्याच जारी केलेल्या नियमावलीत जीम व व्यायामशाळाही खुल्या करण्याची परवानगीही दिली. मात्र, अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडला होता. त्यानुसार राज्य सरकारने महाराष्ट्रातील इनडोअर जीम बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं राज्यभरातील ४ हजारांहून जास्त जीम बंद असल्याने जीम चालक, मालक, प्रशिक्षकांपुढं आर्थिक प्रश्नही उभा राहिला आहे.हेही वाचा-

Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे

पोलिसांसाठी जिमखान्यात विशेष कोविड सेंटर

संबंधित विषय
Advertisement