Advertisement

गुरुवारी आलेल्या प्रवाशांपैकी ३ पॉझिटिव्ह, ऑमिक्रॉनचा अहवाल लवकरच

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तिघांचे नमुने आता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

गुरुवारी आलेल्या प्रवाशांपैकी ३ पॉझिटिव्ह, ऑमिक्रॉनचा अहवाल लवकरच
SHARES

गुरुवार, २ डिसेंबर, विमानतळावर सकाळपर्यंत, ८६१ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात आली होती. ज्यामधून तीन पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तिघांचे नमुने आता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय १ नोव्हेंबरपासून राज्यात दाखल झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे.

दोन्ही विमानतळावरील एकूण २८ नमुने, तसंच फील्ड टेहळणीसाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. या २८ पैकी २५ आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत, तर तीन त्यांचे जवळचे आहेत.

याव्यतिरिक्त, गुरुवारी गेल्या २४ तासांत, महाराष्ट्रात ७९६ नवीन कोविड-19 प्रकरणे, ९५२ बरे झाले आणि २४ मृत्यू झाले. यासह, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार २०९ झाली आहे.

महाराष्ट्राला त्यांच्या प्रवास नियमांमध्ये सुधारणा करण्यास सांगितल्यानंतर, राज्यानं नमूद केलं की केवळ सहा "उच्च जोखीम" देशांतील प्रवाशांना एका आठवड्यासाठी अनिवार्य संस्थात्मक विलगीकरणाक ठेवणं आवश्यक आहे.

अति-जोखीम असलेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, नामिबिया, लेसोथो, इस्वाटिनी आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, "उच्च जोखीम" असलेल्या देशांतील प्रवाशांनी घोषित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणं आवश्यक आहे.



हेही वाचा

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना शासनाची मदत, 'असा' करा ऑनलाईन अर्ज

ओमिक्रॉनचा शिरकाव, २ रुग्ण आढळल्यानंतर महापौर म्हणाल्या...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा