Advertisement

निकृष्ट दर्जाचं धान्य देणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई- छगन भुजबळ

कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचं अन्न वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र. ०२२-२२८५२८१४ तसंच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा.

निकृष्ट दर्जाचं धान्य देणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई- छगन भुजबळ
SHARES

मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचं अन्नधान्य वितरित करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असं असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचं वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी काही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असल्याची दखल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (maharashtra government register police complaint against corrupt ration shopkeepers in mumbai and thane)

त्या अनुषंगाने दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसंच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

अधिकृत शिधावाटप दकान क्र. ४२ ग/२९८ या दुकानाच्या संपूर्ण तपासणीनंतर तपासणीत अनुक्रमे ५१४ किलो तांदूळ, २८३८ किलो गहू, तूरडाळ ११६ किलो आणि चणाडाळ ११२ किलो या शिधावस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. गुन्ह्यामध्ये एकूण रुपये १,०४,२८७/- इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मालवणी पोलिस स्टेशन, मुंबई इथं गुन्हा नोंद क्र. १२१/२०२० अन्वये दि. १६/९/२०२० रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा - मुंबई, ठाण्यात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची 'अशी' सुरू आहे अंमलबजावणी

अधिकृत शिधावाटप दुकान क्र. ३४ ई /१०८ या दुकानाच्या संपूर्ण तपासणी नंतर तपासणीत अनुक्रमे ४८७ किलो तांदूळ, ०९ किलो गहू आणि चणाडाळ ०४ किलो या शिधावस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. गुन्हृयामध्ये एकूण रुपये १८,६७२.०५/- इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घाटकोपर पोलिस स्टेशन, मुंबई इथं गुन्हा नोंद क्र. ७५/२०२० अन्वये दि. ११/०९/२०२० रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

याद्वारे सर्व जनतेस आवाहन करण्यात येतं की, कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचं अन्न वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र. ०२२-२२८५२८१४ तसंच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा. जेणेकरुन अशा अधिकृत शिधावाटप दुकानदारांविरुद्ध कारवाई करणं शक्य होईल. असं नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलं आहे.

हेही वाचा - Ration Shops: मुंबई, ठाण्यात २९ रेशन दुकानदारांवर कारवाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा