Advertisement

मुंबई, ठाण्यात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची 'अशी' सुरू आहे अंमलबजावणी

मुंबई आणि ठाणे परिसरात शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.

मुंबई, ठाण्यात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची 'अशी' सुरू आहे अंमलबजावणी
SHARES

मुंबई आणि ठाणे परिसरात शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली. (one nation one ration card scheme Implementation starts in mumbai and thane)

याविषयी अधिक माहिती देताना कैलास पगारे म्हणाले, ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने १२ सप्टेंबर २०२० रोजी ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस’ साजरा करण्यात आला. तसंच या योजनेची जनजागृती करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता सर्व शिधावाटप कार्यालयामार्फत पोस्टर्सची छपाई करून सर्व अधिकृत शिधावाटप दुकानामार्फत ई-पॉस मशीनद्वारे कशा प्रकारे धान्य वाटप करण्यात येतं, या योजनेचे उद्दिष्ट व फायदे नागरिकांना समजावून सांगण्याचं काम सर्व शिधावाटप अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

वन नेशन वन रेशनकार्ड या योजनेअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, मिझोराम, ओरिसा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार, लेह लडाख, लक्षद्वीप व दीव दमण, जम्मू काश्मीर, मणीपूर, नागालँड, उत्तराखंड अशा राज्य व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेलं अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

सर्व लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येतं की, अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकांधारकांना तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता योजनानिहाय धान्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसंच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर धान्य प्राप्त करुन द्यावं.


हेही वाचा -

राज्यात स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविणार

Ration Shops: मुंबई, ठाण्यात २९ रेशन दुकानदारांवर कारवाई


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा